---Advertisement---

IND vs PAK सामन्याआधी श्रीलंकन खेळाडूंना विराटकडून मिळाली प्रेरणा! व्हिडिओ व्हायरल

Virat With Sri Lankan young players
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट या व्हिडिओत श्रीलंकेतील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहे. शुक्रवारी (8 सप्टेंबर) भारतीय संघ सराव करत होता, त्यावेळी विराट आणि या युवा खेळाडूंची भेट झाली.

भारतीय संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023)च्या सुपर फोर फेरीत पोहोचला आहे. रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघात आमना सामना होणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो शहरात हा सामना आयोजित केला गेला आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कसून सराव करत आहे. शुक्रवारी देखील भारतीय खेळाडू कोलंबोमध्ये सराव करत होता. त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रीलंकेतील काही युवा खेळाडू्ं यांच्यात खेळासंबंधीत महत्वाची चर्चा झाली. विराट कडून या युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओत विराटने केलेले मार्गदर्शन पाहायला मिळते.

भारतीय संघ सुपर फोरमधील आपला पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. मागच्या आढवड्यात ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले होते. दोन्ही संघांमधील हा सामना रंगात असताना पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करावा लागला. रविवारी देखील कोलंबोमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पण दोन्ही संघ आणि चाहत्यांना पाऊस येणार नाही, अशा अपेक्षा आहेत. (Virat Kohli shares his experience with Sri Lankan budding cricketers)

महत्वाच्या बातम्या – 
श्वानप्रेमी विराट! प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखल झालेल्या पपीचा केला लाड, खेळला फुटबॉल
“धोनी साक्षात देवासारखा!”, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सांगितला आयपीएलचा ‘तो’ अनुभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---