---Advertisement---

टीममध्ये निवड न झाल्यामुळे रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं

---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी सर्वांनाच माहिती आहे. त्याचे प्रदर्शन पाहता त्याला संघाबाहेर ठेवण्याचा कोणी विचारही करत नसेल. परंतु एक असाही काळ होता जेव्हा त्याची राज्य संघात निवड होत नसल्यामुळे त्याला झोपही येत नव्हती.

अनअकॅडेमीने (Unacademy) मंगळवारी (२१ एप्रिल) ऑनलाईन सेशनचे आयोजन केले होते. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी यशस्वी होण्याअगोदरच्या आपल्या आयुष्याबद्दल सांगितले.

याबद्दल बोलताना विराटने (Virat Kohli) सांगितले की, “राज्यस्तरीय संघात पहिल्यांदा माझी निवड झाली नव्हती. त्यावेळी मी रात्री ते आठवून रडत बसायचो. त्या रात्री मी जवळपास ३ वाजेपर्यंत रडलो होतो. यावर माझा विश्वास बसत नाही.”

“मी चांगली कामगिरी केली होती. माझ्याबरोबर सर्वकाही चांगले घडत होते. मी त्या टप्प्याच्या जवळ जाईपर्यंत मेहनत घेतली होती. परंतु मला नाकारण्यात आले,” असेही विराट पुढे म्हणाला.

मी माझ्या प्रशिक्षकाला (Coach) दोन तास विचारत होतो की, माझी निवड का झाली नाही? आणि मी याचा अर्थ सांगू शकत नाही. पण जेव्हा जिद्द आणि चिकाटी असते तेव्हा ती प्रेरणा आपल्याकडे परत येते,” असेही विराट यावेळी म्हणाला.

भारताच्या १९ वर्षांखालील संघाला विश्वविजेता बनविणाऱ्या विराटच्या नावावर आता अनेक विक्रम आहेत. विराटला २००८मध्ये पहिल्यांदा भारताकडून वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली होती. खूप प्रयत्न करून संघात आपले स्थान पक्के करणाऱ्या विराटने सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यानंतर कर्णधारपदही पटकाविले.

विराटने आतापर्यंत भारतीय संघाकडून ८६ कसोटी, २४८ वनडे आणि ८२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ५३.६२ च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. यामध्ये २७ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच वनडेत ५९.३३ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. त्यात ४३ शतके आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ५०.८० च्या सरासरीने एकूण २७९४ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी

-फक्त या दोन गोलंदाजांमुळे मोहम्मद शमीचं करियरच गेलं बदलुन

-८ तासांत कसोटीत २७० पेक्षा जास्त धावा करणारे ४ क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---