सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ढाका येथे खेळला गेला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टी20 विश्वचषकापासून भारतीय सलामीवीरांचा खराब फॉर्म या एकदिवसीय सामन्यात देेखील तसाच राहिला. सलामीवीर शिखर धवन 17 चेंडूत अवघ्या 7 धावा करत बाद झाला. थोडीशी फटकेबाजी करुन कर्णधार रोहित शर्माही बाद झाला. शिखर धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीवर या सामन्यात अनेकांचे नजरा होत्या. मात्र, वैयक्तिक 9 धावांवर खेळत असताना तो शाकिब अल हसन याच्या चेंडूवर झेलबाद झाला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने त्याचा उत्कृष्ट झेल पकडला. त्याने पकडलेला हा झेल आता सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय.
https://twitter.com/cric_lob/status/1599295307086725120?s=20&t=CWeCaS0mwsgx9mwLnTl54g
शिखर धवन (Shikhar Dhawan) बाद झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीसाठी मैदानावर आला. टी20 विश्वचषकानंतर तो पहिल्यांदाच मैदानावर उतरला होता. बांगलादेश संघासाठी 11वे षटक टाकण्यासाठी शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा (Rohit Sharma) त्रिफळाचित झाला. शाकिबने टाकलेला हा चेंडू सरळ राहिला आणि रोहित चारीमुंड्या चीत झाला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट स्ट्राईकवर आला आणि त्याने शाकिबच्या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे शॉटवरचे नियंत्रण सुटले आणि चेंडू हवेत गेला. कव्हर्सच्या जागी क्षेत्ररक्षण करणाऱ्या लिटन दास (Litton Das) याने चित्त्याच्या चपळाईने हा झेल पकडला. त्याने पकडलेला हा झेल पाहून विराटने देखील भुवया उंचावल्या. त्याने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मिडीवर प्रचंड व्हायरल होत असून लिटन दास वर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जातोय.
बांगलादेश विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. भारताचा सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. 15 षटकांच्या आतच भारताने आपले 4 गडी गमावले होते. मधल्या फळीत फंलदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केेला, पण श्रेयस अय्यर 24 धावा करत बाद झाला. केएल राहुलने एकाकी झुंज दिली. राहुल 73 धावा करत बाद झाला आणि भारतीय संघाचा डाव 186 धावांवर गडगडला. बांगलादेश संघासाठी शाकिब अल हसन याने 36 धावा देत 5 गडी बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी विजयी मार्गावर परतण्यासाठी चेन्नईयन एफसीला भिडणार
शाकिबच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, विजयासाठी बांगलादेशला दिले 187 धावांचे लक्ष्य






