टी२० विश्वचषकात भारतीय संघाला उशिरा का असेना सूर गवसला. भारतीय संघाच्या अपयशाची अनेक कारणे सांगितली गेली. त्यावर चर्चाही झाली. या टी२० विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहली भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. यावर इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या घोषणेची वेळ चुकीची असल्याची म्हटली आहे. विराटने टी२० विश्वचषकापूर्वी कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून मोठी चूक केली असून त्याने हा निर्णय टी२० विश्वचषकानंतर घ्यायला हवा होता, असे त्याने म्हटले आहे.
विराटने टी२० विश्वचषकानंतर या प्रकारातील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्याचवेळी, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरीही अत्यंत खराब राहिली होती. भारतीय टी२० संघाचा पुढचा कर्णधार कोण होईल, हे पाहणे बाकी आहे. पानेसरने सांगितल्यानुसार, कोहलीच्या या घोषणेनंतर अनेक भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार बनण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि आता त्यांना स्वतःच कर्णधार व्हायचे आहे.
पानेसर म्हणाला, ‘मी यात विराट कोहलीला दोष देणार नाही. त्याच्या जागी काही खेळाडूंना कर्णधार व्हायचे आहे. विराटने स्पर्धेपूर्वी कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून मोठी चूक केली. त्याने आधी विश्वचषक खेळायला हवा होता आणि त्यानंतर निकाल काहीही लागला तरी कर्णधारपदाबाबतची घोषणा करायला हवी होती. विराटने हे केले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. रोहित शर्मा, रिषभ पंत आणि केएल राहुल आता स्वतः कर्णधार होण्याचा विचार करत असतील.’
पानेसर पुढे म्हणाला, ‘भारतीय संघातील इतर खेळाडू यापुढे त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करणार नसून कर्णधारपदाचा विचार करणार आहेत. त्यामुळे या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू असल्यामुळे विराट कोहलीने विश्वचषकापूर्वीच याची घोषणा करायला नको होती.’
भारतीय संघ टी२० विश्वचषकात सध्या ४ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभूत होत, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +१.६१९ इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी