---Advertisement---

तूच खरा हिरो! आधी स्मिथ अन् आता नवीनसाठी उभा ठाकला विराट, दाखवली असामान्य खिलाडूवृत्ती

---Advertisement---

वनडे विश्वचषकातील भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचे वेगवान शतक महत्त्वाचे ठरले. भारतीय संघाने विश्वचषकातील आपला सलग दुसरा विजय मिळवला असताना, भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली व अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील दिलजमाई चर्चेचा विषय ठरली. यासोबतच विराटने दुसऱ्यांदा आपण या खेळाचे सर्वात मोठे खेळाडू का आहोत हे सिद्ध केले.

https://twitter.com/ictfan00_7/status/1712131101773414433?t=7CKqXNYaUrHVHUapAEOijA&s=19

आयपीएलमध्ये विराट व नवीन यांच्या दरम्यान वाद झाला होता. त्यानंतर चाहते सातत्याने नवीन याला ट्रोल करत होते. तो भारतात दाखल झाल्यानंतर अफगाणिस्तान संघ सराव करत असताना तसेच सामने खेळत असताना चाहते नवीन याच्यासमोर कोहली कोहली असे नारे देत होते. या संपूर्ण विश्वचषकात त्याला या गोष्टीला सामोरे जावे लागण्याची शक्यता होती.

भारत आणि अफगाणिस्तान या सामन्यातही प्रेक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणावर उकसवण्याचा प्रयत्न केला. चाहते नवीनसमोर कोहली कोहली असे ओरडत असताना विराटने या चाहत्यांना असे न करण्याचा इशारा केला. त्यानंतर संपूर्ण स्टेडियमवर टाळ्यांचा गजर झाला. विराट व नवीन यांनी गळाभेट घेत हे संपूर्ण प्रकरण मिटल्याचे दर्शवले. ‌

यापूर्वी देखील विराटने अशा प्रकारची कृती करत सर्वांचे मन जिंकले होते. 2019 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी काही चाहते स्टीव्ह स्मिथ याला बुईंग करत होते. त्यावेळी त्याने बुईंग न करता स्मिथसाठी टाळ्या वाजवायला हव्यात असा इशारा केला. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर इंग्लंडचे चाहते सातत्याने स्मिथ विरोधात अशाप्रकारे बुईंग करताना दिसत.

(Virat Kohli Shown Sportsmanship Spirit Again When Claps For Steve Smith And Naveen Ul Haq)

महत्वाच्या बातम्या – 
मिटल एकदाच! अखेर विराट-नवीनमध्ये दिल्लीत दिलजमाई, वादावर पडला पडदा
टीम इंडियाने राखले दिल्लीचे तख्त! हिटमॅनच्या हिटिंगच्या जोरावर नोंदवला वर्ल्डकपमधील सलग दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---