---Advertisement---

आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…

Virat-Kohli
---Advertisement---

सोमवारी(११ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला कोलकाता नाइट रायडर्सने चार विकेट्स राखून पराभूत केले. त्यामुळे आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर झाला. विराटसाठी आयपीएलचा चालू हंगाम आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम होता. त्याने आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्याच्या आधीच या गोष्टीची घोषणा केली होती की, तो पुढच्या वर्षी आरसीबीचे नेतृत्व करणार नाही. असे असले तरी तो एका खेळाडूच्या रूपात संघासोबत सामील होणार आहे.

आता या सामन्यात पारभव झाल्यानंतर यावर्षीही जेतेपद जिंकता न आल्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांची आणि विराटची निराशा झाली आहे. विराटने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामन्यात झालेल्या पराभवानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

त्याने या पोस्टमध्ये तीन फोटो शेअर केले असून त्याच्या सोबत एक खास कॅप्शनही लिहिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला पाहिजे तो निकाल नाही मिळाला, पण खेळाडूंनी स्पर्धेत दाखवलेल्या जबाबदारीचा मला अभिमान आहे. एक निराशाजनक शेवट, पण आपण आपले डोकं उंच ठेऊ शकतो. तुमच्या निरंतर समर्थनासाठी सर्व चाहते, व्यवस्थापक आणि सपोर्ट स्टाफचे आभार.”

दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर विराटने घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसले. कर्णधार विराट कोहली(३३ चेंडूत ३९) आणि देवदत्त पडिक्कलने (१८ चेंडूत २१) संघाचा चांगली सुरुवात करून दिली, पण त्यानंतर आरसीबीचा एकही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे आरसीबीला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. आरसीबीने मर्यादित २० षटकांमध्ये सात विकेट्सच्या नुकसानावर १३८ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात केकेआरने आरसीबीने दिलेले १३९ धावांचे लक्ष १९.४ षटकांमध्ये गाठले. आरसीबीच्या खेळाडूंनी फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही काही महत्वाच्या वेळी चुका केल्या. आरसीबीच्या खेळाडूंनी सामन्यात दोन महत्त्वाचे झेल सोडले, ज्यामुळे सामन्याचे चित्र बदलू शकत होते. केकेआरच्या विजयामध्ये फिरकी गोलंदाज सुनील नरेनची महत्वाची भूमिका राहिली. त्याने गोलंदाजी करताना त्याच्या चार षटकांमध्ये २१ धावा दिल्या आणि चार महत्वाच्या विकेट्स घेऊन आरसीबीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. तसेच फलंदाजी करताना त्याने ३ षटकारांसह २६ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

पराभवानंतर कर्णधार कोहली झाला भावुक, आरसीबीचा ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल

राशिद खानने सांगितली जागातील टॉप-५ टी२० क्रिकेटपटूंची नावे, ‘या’ दोन भारतीयांचा केला समावेश

केवळ ‘या’ गोलंदाजामुळे एलिमिनेटर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, माजी भारतीय क्रिकेटरचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---