---Advertisement---

‘मला तुझा अभिमानच आहे’, कर्णधार म्हणून अंतिम सामन्यातही फेल झालेल्या कोहलीचे बहिणीने वाढवलं मनोबल

Photo Courtesy: instagram / bhawana kohli and virat kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) चाहत्यांचे आयपीएलचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले आहे. सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा चार विकेट्सने पराभव झाला आणि संघ आयपीएल २०२१ मधून बाहेर पडला आहे. विराटचा आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपातील हा शेवटचा सामना ठरला आहे. विराटला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे अनेकांनी त्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्याला समर्थन दिले आहे. आता त्याची बहीन भावना कोहली डिंगरानेही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

भावना कोहली डिंगराने ही पोस्ट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एका कर्णधाराच्या रूपात तुम्ही तुमचे उत्कृष्ट दिले आहे. तुम्ही नेहमी तुमच्या खांद्यांना उंच ठेवले आहे, मग परिस्थिती कितीही कठीण असो. तुम्ही नेहमी एक अप्रतिम कर्णधार राहाल. हे नाव आरसीबीच्या कर्णधापदाचा पर्याय आहे. तुम्ही नेहमीच सन्मान आणि प्रशंसेसाठी पात्र आहात. तुमच्यावर अभिमान आहे भाई.”

https://www.instagram.com/p/CUaf_xfh7vg/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान, विराटने आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होताच खुलासा केला होता की, तो पुढच्या हंगामात संघाचे नेतृत्व करणार नाही. तसेच जोपर्यंत आयपीएल खेळेल तोपर्यंत आरसीबीसाठीच खेळले असेही त्याने स्पष्ट केले होते. विराटने या घोषणेच्या आधी काही दिवसांपूर्वी अजून एक मोठी घोषणा केली होती. आगामी टी-२० विश्वचषक संपल्यानंतर तो भारताच्या टी-२० संघाचेही कर्णधारपद सोडणार आहे.

https://www.instagram.com/p/CS3jGKjrb2J/?utm_source=ig_web_copy_link

कोहलीच्या नेतृत्वात आरसीबी संघ २०१६ मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. तसेच त्याच्या नेतृत्वात संघा चार वेळा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. विराटने २०१३ मध्ये आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत एकूण १४० सामन्यांमध्ये विराटने संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ६६ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जवळचा मित्र कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याने डिविलियर्स भावुक; म्हणाला, ‘त्याला पाहून एकच शब्द आठवतो…’

विराट एकटा कर्णधार नाही, ‘हे’ भारतीय दिग्गजही त्यांच्या आयपीएल फ्रँचायझीला नाही बनवू शकले विजेता

खरी फ्रँचायझी! पराभवानंतर डॅन ख्रिस्चियन आणि पत्नीवर अपशब्दांचा मारा, आरसीबीची ट्रोलर्सला सणसणीत चपराक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---