भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या डावात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी अप्रतिम भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 201 धावा जोडल्या. ही भारतासाठी ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात मोठी सलामी भागीदारी आहे.
जयस्वाल आणि राहुलच्या जबरदस्त फलंदाजीनंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात किंग कोहलीनं शानदार फलंदाजी केली आणि काही मनमोहक शॉट्स खेळले.
गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीनं या सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. त्यानं येताच आश्वासक शॉट्स खेळले. यादरम्यान त्यानं एक जबरदस्त षटकारही मारला. कोहलीनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणातील सर्वात प्रभावी मानल्या मिचेल स्टार्कला शानदार षटकार ठोकला. त्याच्या या शॉटनं सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
भारतीय फलंदाजीच्या 101 व्या षटकात मिचेल स्टार्कच्या एका शॉर्ट बॉलवर विराट कोहलीनं जबरदस्त षटकार ठोकला. त्यानं अप्पर कट शॉट मारला. मात्र, त्यानं मारलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर लागला. चेंडू जोरात होता मात्र त्यामुळे त्या सुरक्ष रक्षणाला कोणतीही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
📂 Virat Kohli’s Swashbuckling six .MP4
📺 #AUSvINDOnStar 👉 1st Test, Day 3, LIVE NOW! #AUSvIND #ToughestRivalry pic.twitter.com/w0KmBbFznu
— Star Sports (@StarSportsIndia) November 24, 2024
हेही वाचा –
IPL 2025 mega auction; या 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश
रोहित संघात परतल्यास कोण ड्रॉप होणार? राहुल पुन्हा बनणार का बळीचा बकरा?
IPL 2025: या 6 वेगवान गोलंदाजांना प्रचंड मागणी, मेगा लिलावात लागणार जॅकपॉट!