अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. दिवस-रात्र असलेला हा सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. इंग्लंडने दिलेले ४९ धावांचे आव्हान भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ७.४ षटकांत विकेट न गमावता सहज पूर्ण केले. रोहितने नाबाद २५ धावा आणि शुबमनने नाबाद १५ धावा केल्या.
दरम्यान, ८ व्या षटकात इंग्लंडचा कर्णधार जो रुट गोलंदाजी करत असताना पहिल्या दोन चेंडूवर रोहितने खणखणीत चौकार ठोकले. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ ६ धावांची गरज होती. त्यामुळे रोहितने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताच्या विजयाने विराट खुश
रोहित आणि शुबमनने ४९ धावांचे आव्हान पूर्ण केल्यानंतर इंग्लंड संघाच्या खेळाडूंशी हस्तोंदलन केले. त्यानंतर ते मैदानातून बाहेर जाण्यास निघाले. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश दिसत होता. त्याने मैदानात येताना आनंदाने पहिले पुढे असलेल्या शुबमनचे अभिनंदन केले आणि नंतर त्याने काहीतरी हसत म्हणताना रोहितचेही अभिनंदन केले. तसेच नंतर इंग्लंड आणि भारताच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तोंदलन केले.
Smiles, handshakes & that winning feeling! 👏👏
Scenes from a comprehensive win here in Ahmedabad 🏟️👍👍 @Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Scorecard 👉 https://t.co/9HjQB6CoHp pic.twitter.com/7RKaBYnXYf
— BCCI (@BCCI) February 25, 2021
अक्षर पटेल विजयाचा हिरो
‘लोकल बॉय’ अक्षर पटेलने या सामन्यातील भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अहमदाबादला असलेले हे मैदान त्याचे घरचे मैदान आहे. घरच्या मैदानावर त्याने दोन्ही डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात २१.४ षटकात ३८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. याबरोबरच त्याने दुसऱ्या डावात त्याने १५ षटकात ३२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासह त्याने या सामन्यात एकूण ११ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“पहिल्या डावात जर आम्ही २५० धावा केल्या असत्या तर…”, इंग्लिश कर्णधाराने सांगितले पराभवाचे कारण
विराट कोहलीने ‘कॅप्टनकूल’ धोनीला तर टाकले मागे आता निशाण्यावर पाँटिंग आणि स्मिथचे विक्रम
पराभवासह इंग्लंडच्या पदरी पडलं ‘हे’ लाजिरवाणं दान, नकोशा यादीत पोहोचले दुसर्या स्थानावर