विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज दुसरा वन-डे सामना विशाखापट्टनम येथे २४ आॅक्टोबरपासून सुरु होत आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केल्यामुळे या सामन्यातही संघाकडून काहिशा अशाच अपेक्षा केल्या जात आहेत.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराटने जर या सामन्यात ८२ धावा केल्या तर तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर येईल.
सध्या या स्थानावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगली आहे. गांगलीने ४२१ सामन्यात ४१.४२ च्या सरासरीने १८४३३ धावा केल्या आहेत.
तर विराट कोहलीने ३४७ सामन्यात ५५.९५च्या सरासरीने १८३५२ धावा केल्या आहेत.
भारताकडून आजपर्यंत ५०० किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचीच सरासरी ही ५०पेक्षा जास्त आहे.
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे खेळाडू-
३४३५७- सचिन तेंडूलकर
२४०६४- राहुल द्रविड
१८४३३- सौरव गांगुली
१८३५२- विराट कोहली
१६८९२- वीरेंद्र सेहवाग
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक
–हरभजनने केले विंडीजच्या फलंदाजाबद्दल मोठे भाकित