गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना पार पडला. दिवस-रात्र स्वरुपात झालेल्या या सामन्यात यजमानांनी १० विकेट्सने विजयाचा बहुमान मिळवला. सोबतच मालिकेतही २-१ ने आघाडी घेतली. सामन्यानंतर भारतीय संघाच्या या विजयाचा नायक ठरला ‘लोकल बॉय’ अक्षर पटेलची कर्णधार विराट कोहलीने चक्क गुजराती भाषेत प्रशंसा केली. त्याचा गुजराती बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.
त्याचे झाले असे की, सामना संपल्यानंतर संघाबाहेर असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या अक्षरची मैदानावर मुलाखत घेत होता. त्यांची मुलाखत संपायला आली असतानाच विराट येतो आणि पंड्याच्या हातून माइक काढून घेतो. त्यानंतर अक्षरकडे पाहून तो म्हणतो की, “ए बापू तारी बोलिंग कमाल छे.” अर्थातच अक्षर तुझी गोलंदाजी शानदार आहे, असे तो गुजराती भाषेत म्हणतो.
विराटला गुजराती बोलताना पाहून तिघेही खदखदून हसू लागतात. त्यांचा हा गमतीशीर व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला एका तासाच्या आतच हजारोंच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत.
याबरोबरच विराटने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतानाही अक्षरची प्रशंसा केली होती. तो म्हणाला की, “मला नाही माहित गुजरातमध्ये असे काय आहे. इथून इतके डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज येतात. जर खेळपट्टीवर मदत मिळत असेल तर, अक्षर पटेल खूप प्रभावी ठरू शकतो.”
DO NOT MISS: @hardikpandya7 interviews man of the moment @akshar2026.👍👍 – By @RajalArora
P.S.: #TeamIndia skipper @imVkohli makes a special appearance 😎@Paytm #INDvENG #PinkBallTest
Watch the full interview 🎥 👇 https://t.co/kytMdM4JzN pic.twitter.com/QLJWMkCNM5
— BCCI (@BCCI) February 26, 2021
https://www.instagram.com/p/CLvcPsuAT2o/?utm_source=ig_web_button_share_sheet
खरे तर, अक्षर हा मुळचा गुजरातचा आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात त्याने पाहुण्या इंग्लंडचे ६ फलंदाज बाद केले. तर दुसऱ्या डावातही तब्बल ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे कर्णधार विराटने त्याची वाहवा करणे साहजिक होते. परंतु अक्षरच्या गुजराती भाषेत दिल्लीकर विराटने त्याचे कौतुक करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डे-नाईट कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, ‘या’ खेळाडूंना दिले कर्णधार कोहलीने विजयाचे पूर्ण श्रेय
INDvsENG: ‘अशा भज्जी-कुंबळेने ८००-१००० विकेट्स घेतल्या असत्या,’ माजी भारतीय अष्टपैलूचे टीकास्त्र
एक कर्णधार म्हणून मी आनंदी आहे की, तो माझ्या संघाचा भाग आहे; पाहा कुणाची केली कोहलीने प्रशंसा