---Advertisement---

‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची सुरू आहे स्पेशल तयारी, नव्या प्रशिक्षकांसह नेट्समध्ये गाळतोय घाम

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 11:56 PM
---Advertisement---

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांतीवर होता. तसेच तो कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही विश्रांतीवर आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय खेळाडू सतत बायो बबलमध्ये असल्यामुळे आणि संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या मालिकेत संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. कर्णधार विराट न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात सामील होईल. याच पार्श्वभूमीवर त्याने या सामन्यापूर्वी सराव सुरू केला आहे. विराटने त्याच्या आयपीएल फ्रेंचायझीच्या नवीन प्रशिक्षकांसोबत फलंदाजीचा खास सराव केला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विराट मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सराव करत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर विराटने त्याचे नवीन प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत फलंदाजीची सराव केला आहे. संजय बांगर यांनी आयपीएल २०२२ साठी विराटच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे.

https://twitter.com/cricbuzz/status/1463736955653394435?s=20

विराटने मागच्या जवळपास दोन वर्षांपासून अपेक्षित प्रदर्शन केलेले नाही. त्याने यादरम्यान एक देखील शतक ठोकले नाही. विराटने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये ७० शतक केले आहेत आणि मागच्या दोन वर्षांपासून या आकड्यात कसलीच वाढ झालेली नाही. त्याने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना ईडन गार्डन मध्ये केले होते. त्यानंतर विराट मोठ्या धावा करण्यात संघर्ष करताना दिसतो आहे.

दरम्यान, विराटच्या शेवटच्या शतकानंतर त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला तर ते खूपच निराशाजनक आहे. यादरम्यान खेळलेल्या १५ डावांमध्ये त्याने अवघ्या २६.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मागच्या २१ डावांमध्ये तो तीन वेळा शून्य धावा करून बाद झाला आहे, तर चार वेळा तो एक आकडी धावसंखेवर बाद झाला आहे. मागच्या जवळपास दोन वर्षात त्याने पाच अर्धशतक केले आहे आहेत.  एकंदरीत विचार केला तर विराटने त्याच्या मागच्या ५६ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये एकदाही शतक केले नाही. त्यामुळे विराटकडून चाहत्यांनी यापेक्षा खूपच चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शुभमन पुन्हा अर्धशतकाला शतकात बदलण्यात फेल, १६ डावांनंतरही ‘या’ बेस्ट स्कोरवरच अडलीय गाडी

भारत-न्यूझीलंड कानपूर कसोटीदरम्यान प्रेक्षकांनी दिले ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, व्हिडिओ व्हायरल

धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---