अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत (Border Gavaskar Trophy) भारतीय संघाला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला होता. या निराशाजनक दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कठोर भूमिका घेत कोणताही खेळाडू तंदुरूस्त असल्यास त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), रिषभ पंत (Rishabh Pant), यशस्वी जयस्वालसह (Yashasvi Jaiswal) अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू रणजी ट्राॅफीमध्ये (Ranji Trophy) खेळताना दिसले. दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आगामी सामन्यांत खेळणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
दरम्यान विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबईत माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Banger) यांच्यासोबत फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मानेच्या दुखापतीमुळे रणजी ट्राॅफीच्या पुढील फेरीत खेळू शकणार नाही, पण (30 जानेवारी) पासून सुरू होणाऱ्या गट टप्प्यातील शेवटच्या फेरीच्या सामन्यासाठी त्याने स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट त्याच्या ऑफ स्टंपच्या कमुकवतपणावर काम करत आहे. बाॅर्डर-गावसकर मालिकेत तो ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवर वांरवार बाद झाला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर देखील आहेत. संजय बांगर 2014 ते 2018 दरम्यान भारताचे फलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी उंची गाठली. त्याने सर्वांनाच आपल्या फलंदाजीने प्रभावित केले.
— V (@CricKeeda18) January 25, 2025
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 123 कसोटी, 295 वनडे आणि 125 टी20 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने या तिन्ही फाॅरमॅटमध्ये एकूण 81 शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
123 कसोटी सामन्यात विराटने 210 डावात फलंदाजी करताना 46.85च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. 295 वनडे सामन्यात त्याने 13,906 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 58.18, तर स्ट्राईक रेट 93.54 राहिला आहे. वनडेत त्याने 72 अर्धशतकांसह 50 शतके झळकावली आहेत. वनडे आंतरराष्ट्रीयमध्ये 50 शतके झळकावणारा विराट जगातील एकमात्र फलंदाज आहे. वनडेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे. 125 टी20 सामन्यात विराटने 4,188 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 राहिली आहे. टी20 मध्ये त्याच्या नावावर 1 शतक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; कर्णधार जोस बटलरची एकतर्फी झुंज! भारतासमोर 166 धावांचे आव्हान
IND vs ENG; दुसऱ्या टी20 सामन्यातही शमीला संधी नाही, कधी होणार पुनरागमन?
25 वर्षीय भारतीय खेळाडूनं जिंकला ‘आयसीसी मेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार!