विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून (१८ जून) साउथम्प्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने मोठे वक्तव्य केले आहे. हा सामना संघासाठी महत्त्वाचा असला तरीही जय-पराभवाचा अधिक दबाव घेणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
विराटने पत्रकार परिषदेत म्हटले की, “हा पाच दिवसांचा एक सामना आहे. यावरुन आमची क्षमता सिद्ध होणार नाही. क्रिकेटची जाण असणाऱ्या लोकांना माहिती आहे की, मागील ४-५ वर्षात भारतीय कसोटी संघाने काय केले आहे. जर आम्ही हा सामना जिंकलो तर क्रिकेट थांबणार नाही. तसेच पराभूत झालो तरीही क्रिकेट थांबणार नाही. आम्ही श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी हा सामना खेळत आहोत आणि आम्हाला याची जाणीव आहे की, एक संघ म्हणून आम्ही काय आहोत.”
पाऊस आणि ढगाळ वातावरण यांच्याही संभाव्यतेकडे लक्ष देणार का? असे विचारले असता विराट म्हणाला, “आमच्या संघात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भरपूर खोली आहे.”
तसेच त्याला जेव्हा विचारण्यात आले की, हा सामना आयुष्यातील सर्वात मोठा सामना आहे का? यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, “नाही, हा माझ्यासाठी फक्त एक सर्वसाधारण कसोटी सामना आहे. या सर्व गोष्टी बाहेरून छान दिसतात. कुठलाही सामना करा किंवा मरा असा असूच शकत नाही. तो एक अद्भुत क्षण असतो. परंतु क्रिकेटदेखील जीवनाप्रमाणे पुढे सरकते. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास दाखवण्याची आवश्यकता आहे. हा चेंडू आणि बॅट यांच्यातील सामना आहे. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “कोविड १९ मुळे पहिल्याच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत बदल झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आमच्या संघाची भूक आणखी वाढली. आमचा संघ आणखी वचनबद्ध झाला होता. त्यानंतर आम्हाला कुठल्या मार्गे जायचे आहे आणि काय प्राप्त करायचे आहे. याबाबत आणखी स्पष्टता मिळाली. म्हणून जर मागे वळून पाहिलं तर ही एक सकारात्मक बाब होती.” (Virat Kohli statement before world test championship final)
तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे नियम बदलले गेले होते, याबाबत बोलताना विराट म्हणाला, “सर्वप्रथम रात्रभरात नियम बदलू नये. कुठल्याही संघाने काही कारणास्तव सामना खेळला नसेल तर त्यांच्यासाठी काहीतरी नियम आखले गेले पाहिजे. ”
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या दोन माजी कर्णधारांनी WTC फायनलसाठी टाकले ‘या’ संघाच्या पारड्यात वजन
दुर्दैवी शेफाली! चार धावांनी हुकले पदार्पणातील शतक, पण नावे केले ‘हे’ विक्रम