भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा आयपीएल (IPL) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore) संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल स्पर्धा सुरू झाली तेव्हापासूनच त्याने या संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. गेली अनेक वर्ष या संघाचे नेतृत्व केल्यानंतर आगामी हंगामात तो केवळ एक फलंदाज म्हणून खेळताना दिसून येणार आहे.
गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याने भारतीय वनडे, टी२० आणि कसोटी संघाच्या कर्णधार पदावरून देखील पाय उतार केली आहे. गेल्या १४ हांगमापासून तो एकाच संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याची खासियत म्हणजे त्याने कधीच आयपीएल स्पर्धेच्या ऑक्शनमध्ये सहभाग घेतला नाही.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदाही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला जेतेपद मिळवण्यात यश आले नव्हते. त्याला अनेकदा इतर फ्रँचायजींनी संपर्क केला होता. परंतु विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सोडून इतर संघात जाण्याचा विचार केला नव्हता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला की, “ऑक्शनमध्ये येण्यासाठी मला अनेकदा संपर्क केला गेला होता. असे अनेक महान खेळाडू होऊन गेले ज्यांनी, ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि अशा गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या आहेत. परंतु मी इतकेच म्हणेल की, जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर लोक तुम्हाला जवळ करतील. जर वाईट असाल तर दूर करतील.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सोबत असलेली निष्ठा ही त्या ४-५ लोकांपेक्षा खूप जास्त आहे. जे म्हणतात की,तुम्ही एक्सवायझेड सोबत आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. या फ्रँचायजीने मला पहिल्या ३ वर्षांत जे काही दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”
महत्वाच्या बातम्या :
शेवटी क्रिकेटप्रेम! भारतीय संघ विश्वचषक जिंकावा म्हणून लता मंगेशकरांनी ठेवला होता निर्जळी उपवास
गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ