ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला. नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याने अशक्यप्राय वाटणारा विजय भारताच्या पारड्यात टाकला. मात्र, विराट ही खेळी करत असताना भारतातील ऑनलाईन शॉपिंग आणि आर्थिक व्यवहार ठप्प पडले होते.
केएल राहुलच्या रूपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसल्यानंतर विराट फलंदाजासाठी मैदानात उतरला. तो मैदानात आल्यानंतर सातव्या षटकापर्यंत भारताने चार गडी गमावले. त्यानंतर त्याने अष्टपैलू हार्दिक पंड्यासह 103 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1584499354320371713?t=lmBTYKH-g35HwKMVBH1Sgw&s=19
एका आघाडीच्या युपीआय कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले. रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत भारतीयांनी खूप खरेदी केली. यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने मोठा आर्थिक व्यवहार झाला. खरेदीचे हे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा जास्त होते. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू झाल्यानंतर अचानक लोकांनी खरेदी बंद केली. त्यामुळे हे प्रमाण अचानक ऋण 5 टक्क्यांवर पोहोचले.
भारतीय संघाचा डाव आणि त्यातही विराट कोहली याची फलंदाजी सुरू झाल्यावर मात्र, यात आणखीच घसरण झाली. आश्चर्यकारकरीत्या हे प्रमाण तब्बल ऋण 22 टक्के इतके घसरले. त्यामुळे एक प्रकारे भारतातील आर्थिक व्यवहारच विराटच्या या खेळीमुळे थांबले गेले. सामना संपल्यावर मात्र पुन्हा लोकांनी खरेदीला प्राधान्य दिले. ऋण 22 वर असलेले हे प्रमाण रात्री नऊ वाजता 5 टक्के गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पराभव पाकिस्तानचा झळ मात्र ऑस्ट्रेलियाला! भारताकडून 19 वर्ष जुना विश्वविक्रम मोडीत
शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच