---Advertisement---

गर्विष्ठ असल्याची सातत्याने टीका होणाऱ्या विराटनेच मैदानात घुसलेल्या चाहत्यासाठी दाखवली माणुसकी, व्हिडिओ व्हायरल

On: गुरूवार, जुलै 15, 2021 4:51 PM
---Advertisement---

व्यक्तीच्या स्वभावामुळे त्याची नेहमीच पारख होत असते, असं म्हटलं जातं. भारताचा कर्णधार विराट कोहलीचीही त्याचे मैदानावरील हावभाव, कृती आणि आक्रमकता यावरुन तो गर्विष्ठ किंवा रागीट असल्याची चर्चा होते. अनेक दिग्गजांनीही त्याचा स्वभाव आक्रमक असल्याचे म्हटले आहे. मात्र, नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना विराटमधील माणूसकीचेही दर्शन घडले आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की मैदानावर भारतीय संघाचा कसोटी सामना सुरु असताना एक प्रेक्षक बॅरिकेडवरून उडी मारून थेट मैदानात प्रवेश करतो. त्या प्रेक्षकाच्या शरीरावर ‘व्हीके’ असे लिहिलेले दिसून येत असल्याने तो विराटचा चाहता असल्याचे यावरुन समजते.

पुढे तो चाहता मैदानात प्रवेश करून तो सरळ धावत भारतीय संघाच्या खेळाडूंकडे जाताना दिसतो. तसेच विराटलाही भेटतो. त्यानंतर विराट त्याच्याशी बोलत असतानाच सुरक्षा रक्षक त्या प्रेक्षकाला पकडण्यासाठी आले असतानाच तातडीने विराट त्यांना दूर थांबण्यास सांगतो. हा व्हिडिओ पाहून अनेकजण विराटच्या दिलदारपणाचे कौतुक करत आहेत.

https://www.instagram.com/p/CQoVOn1pxMJ/

यापूर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज लेंडल सिमन्सने विराट कोहलीला गर्विष्ठ म्हटले होते. तसेच, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नसीरुद्दीन शाहने विराट कोहलीला जगातील सर्वात गर्विष्ठ खेळाडू म्हटले होते. पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधून दिसते की जरी विराट मैदानात आक्रमक असला तरी तो त्याच्या चाहत्यांशी आपुलकी ठेवून आहे.

विराटने यापूर्वीही अनेकदा आपल्या चाहत्यांप्रती प्रेम दाखवले आहे. अनेकदा तो त्याच्या चाहत्यांची भेट घेत असतो. तसेच त्याला भेटायला आलेल्या लहान मुलांनाही त्याने नाराज न केल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

तसेच एखाद्या चाहत्याने सुरक्षा रक्षकांना भूल देऊन आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केल्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा चाहत्यांनी ही पातळी ओलांडली आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

यांचं वेगळंच! सहकाऱ्याने झेल पकडूनही पाकिस्तानी यष्टीरक्षक नाखूश, भर मैदानात घातला वाद

रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी ऐकताच रैना, हरभजन सिंगने दिली अशी प्रतिक्रिया

होय आमचं आहे! राहुल-अथियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम, खुद्द क्रिकेटरने दिली कबुली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---