गुजरात टायटन्सविरुद्ध झालेला आयपीएल २०२२मधील ४३ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ६ विकेट्सने गमावला. या सामन्यादरम्यान बेंगलोर संघासाठी सकारात्मक बाब राहिली, विराट कोहलीची फलंदाजी. धावा बनवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. तब्बल १४ डावांनंतंर विराटच्या बॅटमधून आलेले हे पहिले अर्धशतक आहे. या खेळीदरम्यान त्याने एक शानदार षटकार ठोकला, ज्याची फार चर्चा होत आहे.
विराटने (Virat Kohli) त्याच्या खेळीदरम्यान एकमेव षटकार (Virat Kohli Six) ठोकला, ज्यावर तो बाद होण्यापासून बालंबाल वाचला. त्याने गुजरातविरुद्ध ५३ चेंडू खेळताना १०९.४३ च्या सरासरीने ५८ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारले. विराटची ही अर्धशतकी खेळी (Virat Kohli Half Century) भलेही संथ असली तरीही, त्याच्या या खेळीमुळे संघाची धावसंख्या १७० पर्यंत गेली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान गुजरातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या एका चेंडूवर लाँगऑनवर विराटने हवेत फटका मारला, जो षटकारासाठी सीमारेषेपार गेला. मात्र लाँगऑनवर क्षेत्ररक्षणासाठी एक खेळाडू उभा होता. त्यामुळे एकवेळ पाहून असे वाटत होते की, तो झेल टिपेल आणि विराटची विकेट जाईल. परंतु तसे झाले नाही. चेंडू उंचावरून गेल्याने क्षेत्ररक्षकाला झेल घेता आला नाही आणि चेंडू षटकारासाठी सीमारेषेपार गेला.
चेंडूही षटकारासाठी गेल्याचे पाहून विराटच्या जिवात जीव आला आणि त्याने पुढील चेंडूवरच चौकार मारत गोलंदाजांच्या आशांचा चक्काकूर केला.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान विराटचे हे अर्धशतक आयपीएल २०२२च्या चालू हंगामातील त्याचे पहिलेवहिले अर्धशतक आहे. तसेच हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील ४३ वे अर्धशतक आहे. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी शिखर धवन ४८ अर्धशतके आणि डेविड वॉर्नर ५३ अर्धशतकांसह अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.३ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर बेंगलोरचे लक्ष्य पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL| पुढील वर्षी धोनीची जागा घेत ‘हे’ ३ खेळाडू बनू शकतात चेन्नईचे भविष्यातील कर्णधार
झेलबाद झाला गिल, परंतु डीआरएसमध्ये निघाला नो बॉल; नाट्यमय प्रसंगामुळे पंचांवर चिडला विराट
नऊ पैकी ८ सामने जिंकूनही गुजरात टायटन्ससाठी दूर आहे प्लेऑफ, जाणून घ्या गणिते