जून महिन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये काउंटी पदार्पण करणार आहे. पण अाता त्याच्या या पदार्पणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनुसार विराट मनक्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.
मुंबई मिररमध्ये दिलेल्या वृत्तानुसार मुंबईच्या अस्थितज्ञांनी विराटला मनक्याच्या दुखापत झाल्याचे निदान केले आहे.
तसेच डॉक्टरांनी सांगितले आहे की, जर त्याने विश्रांती घेतली नाही तर त्याला इंग्लंड दौऱ्यातील काही सामन्यांना मुकावे लागू शकते. त्यामुळे जर विश्रांती घ्यायची असेल तर त्याला कौंटी क्रिकेटच्या सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की विराटची दुखापत ही मनक्याची नसुन मानेची आहे.
एका वरीष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, “विराटला थकवा जाणवतं आहे. हे दुखापतीपेक्षाही कामाच्या ताणामुळे होत आहे. पण त्याच्याबाबतीत हा त्रास मनक्याचा नाही. आत्ता आम्ही त्याच्या कामाच्या ताणाकडे लक्ष देत आहोत. ”
“आम्ही त्याचे काउंटीचे सामने कमी करण्याची योजना करत आहोत. मुळ योजनेप्रमाणे तो यात 2 चार दिवसीय सामने खेळणार आहे. तसेच तो रॉयल लंडन कपमधील 5 सामने(50 षटकांचे) खेळणार नाही. ”
” सरकारच्या फिटनेस चॅलेंजचा भाग म्हणून विराटने काल त्याच्या फिटनेसचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ त्याने कालच शूट केला आसणार” असेही या आधिकाऱ्यांनी सांगितले.
विराटला सरे या इंग्लडमधील काउंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू
–सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!
-आयपीएल 2018 मध्ये या 6 खेळाडूंची आहे गोलंदाजांमध्ये दहशत
-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!
-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!