ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेच्या पराभवानंतर विराट कोहली खूपच दबावात दिसून येत आहे. वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतील अजून एक वनडे सामना बाकी आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुध्द टी-20 आणि कसोटी मालिका खेळायची आहे.
अशात ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे आव्हान यावेळी विराट कोहलीसाठी अग्निपरीक्षा असल्यासारखे दिसत आहे. मागील सलग पाच वनडे सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कधीही भारतीय संघाला एवढ्या सलग सामन्यात पराभूत व्हावे लागले नव्हते.
सलग पाच सामन्यात पराभव
विराट कोहली सन 2013 पासून भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करत आहे. तर 2017 पासून तो भारताच्या वनडे संघाचा नियमित कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कित्येक विजयाचे विक्रम केलेत. पंरतु, मागील पाच वनडे सामन्यात भारतीय संघाला सलग पराभूत व्हावे लागले. पराभवाची ही मालिका यावर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या हॅमील्टन मैदानापासून सुरू झाला होता.
न्यूझीलंडच्या या दौऱ्यात भारतीय संघाला सलग 3 वनडे सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौर्यात सलग दोन वनडे सामन्यात भारताला हार बघावी लागली. यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
सलग पराभवाचा नकोसा विक्रम
मागील 46 वर्षांमध्ये भारतीय संघाला सर्वात जास्त सलग 8 वेळा वनडेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या नकोशा विक्रमाची सुरुवात 1981मध्ये सुनील गावस्करांच्या नेतृत्वाखाली झाली होती. पराभवाचा ही मालिका सिडनीच्या मैदानापासून सुरू झाली होती. त्याच्यानंतर 1989 मध्ये भारताचा सलग 7 सामन्यात पराभव झाला होता. त्या काळात भारतीय संघाची धुरा श्रीकांत आणि वेंगसरकर यांच्या हातामध्ये होती. आता भारतीय संघाला सलग पाच वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हिटमॅन’शिवाय यश मिळेना! रोहितविना खेळणाऱ्या भारतीय संघाची आकडेवारी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
सेनेगल फुटबॉल संघाचा मिडफिल्डर पापा बौबा डिओपचे ४२व्या वर्षी निधन
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”