भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुनरागमन करतो आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर कोहलीने पालकत्व रजेमुळे माघार घेतली होती. ११ जानेवारीला कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का यांना कन्यारत्नाचा लाभ झाला.
त्यांनतर आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. ही मालिका भारतीय संघाच्या दृष्टीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे कोहलीला कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही या मालिकेत भारतीय संघासाठी भरीव योगदान द्यावे लागेल.
याच पार्श्वभूमीवर कोहली नेट्समध्ये सराव करताना दिसून आला. कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सरावाचा फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच याला त्याने एक विशेष कॅप्शन देखील दिले आहे. “खाली पाहा आणि एकाग्रतेने काम करत राहा”, असे कोहलीने हा फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CKy3ud2l9sU/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून पहिले दोन्ही कसोटी सामने चेन्नईच्याच चेपॉक मैदानावर खेळवण्यात येतील. या सामन्यासाठी दोन्ही संघ आठवड्याभरापूर्वीच चेन्नईत दाखल झाले होते. परंतु क्वारंटाईनच्या नियमांमुळे त्यांना सरावाला सुरुवात करता आली नव्हती. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्याने कालपासून म्हणजेच २ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ गेममुळे बुमराहच्या समोर खेळण्यासाठी आला आत्मविश्वास, युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा अजब खुलासा
निवृत्ती घेतल्यानंतर डिंडाने मानले सौरव गांगुलीचे आभार; म्हणाला, दादाने मला नेहमीच