---Advertisement---

क्वारंटाईनमध्येही कोहली घेतोय फिटनेसवर मेहनत, वर्कआउट करतानाचा व्हिडिओ केला शेअर

On: शुक्रवार, जानेवारी 29, 2021 10:12 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ चेन्नईत यापूर्वीच दाखल झाले आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या नव्या नियमावलीमुळे क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्यासाठी दोन्ही संघ सध्या हॉटेलमध्येच वास्तव्याला आहेत. २ फेब्रुवारीपासूनच दोन्ही संघांना सरावाला सुरुवात करण्याची परवनागी आहे.

मात्र असे असले तरी हॉटेलच्या रूममध्येच खेळाडूंच्या फिटनेससाठी जिमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचाच लाभ घेत रूममध्ये वर्कआउट करत असतानाचा व्हिडिओ भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

या व्हिडिओला त्याने हटके कॅप्शनसुद्धा दिले आहे. “योग्य म्युजिक आणि जिमच्या सुविधा, या दोनच गोष्टी क्वारंटाईन मध्ये पुरेशा असतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुठेही मेहनत घेऊ शकता. सगळ्यांना दिवस उत्तम जावो”, असे त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CKnsxNWAzNl/

वडील झाल्यानंतर कोहलीची पहिलीच मालिका 

दरम्यान, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना ११ जानेवारीला कन्यारत्न झाले. त्यांनतर विराट कोहलीची ही पहिलीच मालिका असेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्याने पालकत्व रजेमुळे माघार घेतली होती. त्यामुळे एका अर्थी विराटसाठी ही पुनरागमनाची मालिका असेल. या मालिकेत दमदार कामगिरी करून भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी तो उत्सुक असेल.

महत्वाच्या बातम्या:

सौरव गांगुली यांच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट आले समोर, या दिवशी मिळणार डिस्चार्ज

PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी, राजस्थानचा पाडाव करत तामिळनाडू अंतिम फेरीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---