पर्थ। आजपासून(14 डिसेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला योग्य ठरवत आॅस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच आणि मार्क्यूस हॅरिस सलामीवीरांनी 112 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी तोडण्यात बुमराहला यश आले त्याने दुसऱ्या सत्रात 50 धावांवर असणाऱ्या फिंचला बाद केले. त्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, हॅरिस आणि पिटर हँड्सकॉम्बने नियमित कालांतराने विकेट गमावल्या.
यात इंशात शर्माच्या गोलंदाजीवर हँड्सकॉम्बचा तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने एका हाताने अफलातून झेल घेतला आहे.
इशांतने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर हँड्सकॉम्बने फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटवर लागून स्लीपच्या दिशेला उडाला. तेव्हा दुसऱ्या स्लीपमध्ये असणाऱ्या विराट कोहलीने उडी मारत उजव्या हाताने हा झेल पकडला आणि हँड्सकॉम्ब 7 धावांवर बाद झाला.
TAKE A BOW @IMVKOHLI 🇮🇳👑
A piece of genius from #KingKohli in the slips https://t.co/EM9t1uPKGo #Kohli #ViratKohli pic.twitter.com/64WGLLKDKM
— Telegraph Sport (@telegraph_sport) December 14, 2018
त्यामुळे आॅस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 148 धावा अशी झाली होती. आॅस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच आणि मार्क्यूस हॅरिसने अर्धशतक केले आहे. फिंचने 50 आणि हॅरिसने 70 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–१९९० नंतर टीम इंडियाच्या बाबतीत केवळ चौथ्यांदाच घडले असे काही…
–विराट कोहलीचे टेन्शन वाढले, चांगली कामगिरी केली नाही तर…
–धोनी, गांगुलीप्रमाणे किंग कोहलीच्या नावावरही झाला नकोसा विक्रम
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: पर्थ कसोटीला आॅस्ट्रेलियाची शानदार सुरुवात