---Advertisement---

उडता कोहली! डाव्या हाताने विराटने घेतला राशिदचा अफलातून झेल, पाहून तुम्हीही म्हणाल ‘लाजवाब’

---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंड संघ या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने आदिल राशिदचा अफलातून झेल घेतला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

झाले असे की भारताने दिलेल्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे ७ फलंदाज बाद झाल्यानंतर ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आदिल राशिद आला. त्याने सॅम करनला शानदार साथ देताना अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची भागीगारी रंगत असतानाच शार्दुल ठाकूर ४० वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राशिदने जोरदार फटका मारला.

मात्र, त्यावेळी शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहलीने डावीकडे सूर मारत डाव्या हाताने अप्रतिम झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. त्याच्या या अफलातून झेलामुळे राशिद १९ धावांवर बाद झाला. तसेच इंग्लंडला ८ वा धक्का बसला.

विराटने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले आहे की ‘उडता कोहली’.

राशिदच्या आधी जेसन रॉय(१४), जॉनी बेअरस्टो(१), बेन स्टोक्स (३५), जॉस बटरल(१५) लियाम लिव्हिंगस्टोन (३६), डेव्हिड मलान (५०) आणि मोईन अली (२९) यांनी विकेट्स गमावल्या होत्या.

भारताचे इंग्लंला ३३० धावांचे आव्हान

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. भारताने याचा फायदा घेत ४८.२ षटकात सर्वबाद ३२९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून शिखर धवन(६७), रिषभ पंत(७८) आणि हार्दिक पंड्याने(६४) अर्धशतके केली. तसेच इंग्लंडसाठी सर्वाधिक ३ बळी वेगवान गोलंदाज मार्क वूडने टिपले. लेग स्पिनर आदिल रशीदने दोन बळी आपल्या नावे केले. सॅम करन, मोईन अली, रिस टोप्ली, लियाम लिव्हींगस्टोन व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

भुवनेश्वर कुमारच्या अप्रतिम चेंडूवर पहिल्याच षटकात ३ चौकार ठोकणारा जेसन रॉय क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

अरे वा! ४५ वर्षात भारताविरुद्ध असं पहिल्यांदाच घडलंय, इंग्लिश गोलंदाजांचा अनोखा कारनामा

‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---