---Advertisement---

जेवलीस का गं..? इशाऱ्यांद्वारे विचारपूस; गरोदर अनुष्काची मैदानावर असतानाही विराट घेतोय काळजी

On: मंगळवार, ऑक्टोबर 27, 2020 8:36 PM
---Advertisement---

कोविड-१९ मुळे संयुक्त अरब अमिरातीत (युएई) दर्शकांविना इंडियन प्रिमीयर लीगच्या तेरावा हंगामातील सामने खेळले जात आहेत. मात्र आयपीएल गवर्निंग काउंसिलने क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सामन्यादरम्यान त्याला चीयर करताना स्टेडियममध्ये दिसून येते. दरम्यान अगदी सामना सुरु असतानाही विराटही तिची काळजी घेत असतो.

विराट- अनुष्काचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विराट मैदानावरुन अनुष्काला इशाऱ्यात ‘जेवलीस का,’ असे विचारताना दिसत आहे.

अनुष्का सध्या विराटच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघाला सपोर्ट करण्यासाठी युएईला गेली आहे. बऱ्याचदा बेंगलोरचा सामना चालू असताना ती स्टेडियममध्ये दिसून येते. अनुष्का सध्या गरोदर (प्रेगनेन्ट) आहे. त्यामुळे विराट आपल्या पत्नीची खूप काळजी घेताना दिसतो.

https://www.instagram.com/p/CGxKLxDpar8/?utm_source=ig_web_button_share_sheet

काही दिवसांपुर्वी बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज आणि विराटचा जवळचा मित्र एबी डिविलियर्सने विराट-अनुष्काचा एक फोटो काढला होता. त्यांचा तो फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अनुष्काव्यतिरिक्त युझवेंद्र चहलची होणारी धनश्री वर्माही स्टेडियममध्ये बेंगलोरला चीयर करताना दिसते.

महत्त्वाच्या बातम्या-

चाहत्यांसाठी खुशखबर! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झालेला रोहित शर्मा खेळणार हैदराबाविरुद्धचा सामना?

धक्क्यावर धक्के! आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंची ‘या’ मोठ्या टी२० लीगमधून माघार

काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार

ट्रेंडिंग लेख-

चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे

…आणि सचिनचे शब्द‌ हार्दिकने खरे करून दाखवले !

बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---