भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीसाठी मागील एक वर्ष खूप चांगले गेले. 2019 सालापासून जवळपास 3 वर्षे वाईट फॉर्ममधून गेलेल्या कोहलीने एका मुलाखतीत म्हटले आहे की, तो ज्याप्रकारे आधी फलंदाजी करत होतो त्याचप्रमाणे गेल्या एका वर्षात तो तसाच खेळत आहे, परंतु त्याने आपल्या मागील यशातून सतत प्रेरणा घेतली आणि पुढे जात राहिला.
विराट कोहलीने (Viart Kohli) माध्यमांतील वृतांना दिलेल्या मुलाखतीत आशिया चषक 2023 पूर्वीच्या तयारीबद्दल सांगितले की, “मी माझ्या भूतकाळातील यशापासून प्रेरणा घेतो. मी अशा क्षणांचा विचार करतो जेव्हा मी बॅटने माझे सर्वोत्तम कार्य संघासाठी देत होतो. पराभवानंतर मी कुठे सुधारणा करू शकतो अशा सर्व पैलूंचे विश्लेषण मी करत असतो. प्रत्येक अपयश मला मजबूत बनवन्यासाठीच येते असे मला वाटते. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि नेहमी सकारात्मक विचार करने यामुळे मला माझा खेळ सुधारण्यास मदत होते.”
विराट पुढे म्हणाला की, “मला माझ्या प्रशिक्षणात कोणतेही अंतर सोडायचे नाही. मी सतत प्रशिक्षणासाठी अधिकाधिक वेळ देतो जेणेकरून मी स्वत:ला मजबूत करू शकेन आणि दुखापतींपासूनही दूर राहू शकेन. हे तुम्हाला तुमच्या खेळामधील आव्हानांचा सामना करण्यास मदत करते. यासोबतच तुम्हाला चांगल्या विश्रांतीचीही गरज आहे. या कारणास्तव, मी चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करतो जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.”
विराटने पुढे टीकाकारांबद्दल म्हणाला की, लोकांचे मत आणि निर्णय नेहमीच वेगळे असतात. मात्र, मी माझ्या क्षमतेवर आणि स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवायला शिकलो आहे. हा आत्मविश्वास माझ्या मैदानावरील कामगिरीचे सर्वात मोठे कारण आहे. (virat kohli talk about his successful cricket carier)
महत्वाच्या बातम्या-
चहल मोडणार पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचे रेकॉर्ड, 100 विकेट्सचा होणार मानकरी
आशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा! शाकिबच्या नेतृत्वात उतरवली तगडी टीम