Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मैदानावरच नव्हेतर मैदानाबाहेरही ‘किंग’ आहे कोहली! चाहत्यांना दिली अशी वागणूक; पाहा व्हिडिओ

October 21, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


टी20 विश्वचषकाच्या (2022 T20 World Cup) सुरुवातीनंतर पहिल्या फेरीच्या सामन्यांमध्ये अनेक अनपेक्षित निकाल लागले. असे असले तरी सर्व चाहत्यांना 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) सामन्याची प्रतीक्षा आहे. क्रिकेटविश्वातील हे दोन्ही मातब्बर संघ ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी (MCG) आमने-सामने येतील. भारतीय संघाने आता या सलामीच्या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केलीये. भारतीय संघ ब्रिस्बेन येथे सराव करत असताना, काही भारतीय चाहत्यांमुळे विराट कोहलीला सरावात अडथळा निर्माण होत होता. त्यावेळी त्याने शांतपणे या प्रेक्षकांना न बोलण्याची विनंती केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

During the practice Virat Kohli calmly said something like this to the fans .@imVkohli 👑 pic.twitter.com/3X5LnNTQsV

— Hemant Singh (@Hemant18327) October 20, 2022

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली नेट्समध्ये सराव करताना दिसतोय. त्यावेळी काही चाहते नेट्सच्या बाहेर ‘मैदानाच्या बाहेर मार’ असे म्हणताना तसेच मोठ्याने हसताना ऐकू येत आहेत. त्यावर कोहली शांतपणे त्यांना समोर येत ‘मित्रांनो, शांत बसता का? सरावावेळी बोलल्याने लक्ष विचलित होते’ असे म्हणताना दिसून येतोय. विराट या चाहत्यांना अत्यंत समजावणीच्या सुरात ही विनंती करताना दिसून आला. चाहत्यांनी देखील त्याच्या या विनंतीला मान दिला. तसेच चाहते राजा हा राजा असतो असे देखील म्हणत आहेत.

भारतीय संघ या विश्वचषकात ब गटामध्ये सामील आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ सामील आहेत. तसेच पात्रता फेरीतून नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे यांनी मुख्य फेरीपर्यंत मजल मारली.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघाच्या जर्सीत दिसला रोहित शर्मा! पाहा नक्की काय आहे प्रकरण
आशिया चषक 2023 विषयी रॉजर बिन्नींची पहिली प्रतिक्रिया, दिले स्पष्ट उत्तर


Next Post
Rohit Sharma

शाहीन आफ्रिदी, नसीम शाह यांचा सामना करण्यासाठी कॅप्टन रोहितची खास ट्रेनिंग

Hira-Mani-And-Ind-vs-Pak

'मी मेले तरी माझा नवरा आधी...', भारताविरुद्धच्या सामन्याविषयी पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक भाष्य

KL-Rahul

इंग्लंडच्या दिग्गजाने केले शिक्कामोर्तब! म्हणतोय, "केएल राहुल जगातील नंबर वन फलंदाज"

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143