---Advertisement---

‘क्रिकेटर कम मेंटॉर’, सामना विजयानंतर राजस्थानच्या युवा ब्रिगेडला कोहलीकडून मोलाचे मार्गदर्शन-VIDEO

On: गुरूवार, सप्टेंबर 30, 2021 3:03 PM
---Advertisement---

बुधवारी (२९ सप्टेंबर) दुबई येथे इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) मधील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत प्ले ऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. राजस्थानसाठी हा पराभव म्हणजे स्पर्धेतील आव्हान संपल्यासारखे आहे. या सामन्यानंतर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली राजस्थानच्या सर्व युवा खेळाडूंसोबत संवाद साधताना दिसून आला.

विराटने साधला राजस्थानच्या खेळाडूंशी संवाद
या सामन्यानंतर विराट कोहली राजस्थान रॉयल्सच्या सर्व युवा खेळाडूंसोबत संवाद साधताना दिसून आला. एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो राजस्थानचे खेळाडू महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, अनुज रावत, रियान पराग व यशस्वी जयस्वाल यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे.

यापूर्वीही केले युवा खेळाडूंना मार्गदर्शन
आयपीएल २०२१ मध्ये युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची ही विराटची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर तो युवा सलामीवीर व्यंकटेश अय्यरसह चर्चा करताना दिसून आला होता. त्यानंतर, मुंबईचा खराब फॉर्ममधून जात असलेला युवा फलंदाज ईशान किशन याला देखील त्याने मार्गदर्शन केले होते.

राजस्थानचा पुन्हा पराभव
सलग दोन पराभवानंतर विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या राजस्थानला या सामन्यात यशस्वी जयस्वाल व एविन लुईस यांनी ७७ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांचा एकही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. लुईसने राजस्थानसाठी सर्वाधिक ५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बेंगलोरसाठी ग्लेन मॅक्सवेल याने सलग दुसरे अर्धशतक झळकावत आना नाबाद ५० धावा केल्या. यष्टीरक्षक एस. भरतने ४४ धावांचे योगदान दिले व संघाला ७ गड्यांनी विजय मिळवून दिला. दोन बळी घेणारा बेंगलोरचा युजवेंद्र चहल सामनावीर ठरला. आणखी एक विजय मिळविल्यानंतर बेंगलोर प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या-

रहाणे, पुजाराने कोहलीच्या नेतृत्त्वाबाबत केली तक्रार? बीसीसीआयची याप्रकरणी आली ‘पहिली’ प्रतिक्रिया

मॉर्गनसोबत झालेल्या विवादावर अश्विनचे तिखट प्रत्युत्तर, भल्यामोठ्या ट्वीटसह दिल्या कानपिचक्या

ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---