‘रनमशीन’ आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. तो गेल्या ३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करू शकलेला नाही. तर गेल्या ६ महिन्यात त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. अशात क्रिकेट चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूंनाही विराटने जुन्या रंगात परण्याची अपेक्षा आहे. याच कारणामुळे आता चाहत्यांसह क्रिकेटपटूही विराटने फॉर्मात परतण्यासाठी प्रार्थना करू लागले आहेत.
आता याच साखळीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याचेही नाव जोडले गेले आहे. आफ्रिदीही विराट लयीत परतण्यासाठी प्रार्थना करत आहे.
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आशिया चषक २०२२ मध्ये (Asia Cup 2022) एकमेकांशी भिडणार आहेत. उभय संघांतील सामना २८ ऑगस्टला दुबईत रंगणार आहे. या सामन्यासाठी विराट आणि दुखापतग्रस्त आफ्रिदी युएईला गेले असून सराव सत्रात वेळ घालवत आहेत. दुबईत भारत आणि पाकिस्तानचे सराव सत्र सुरू आहेत. या सराव सत्रांदरम्यान २-३ वेळा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटले आहेत. नुकतेच विराट (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यानंतर आता गुरुवारी (२५ ऑगस्ट) विराट दुखापतग्रस्त आफ्रिदीशीदेखील भेटला आहे. या भेटीदरम्यान कोहलीने आफ्रिदीला त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीबद्दल विचारपूस केली. तर आफ्रिदीनेही विराटशी (Virat Kohli Meets Shaheen Afridi) प्रेमळ संवाद साधला.
The suspense is over! Let's listen to the conversation between @iShaheenAfridi and @imVkohli 🔊#AsiaCup2022 pic.twitter.com/ttVYLrNtuO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 26, 2022
आफ्रिदी विराटला धीर देत म्हणाला की, “आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत की, तू लवकर जुन्या फॉर्मात परतावे. तुला पुन्हा जुन्या रंगात खेळताना पाहायचे आहे.” यावर विराट आफ्रिदीला स्माइल देतो आणि धन्यवाद म्हणून निघून जातो. आफ्रिदीच्या या कृतीने भारतीय क्रिकेटचाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Stars align ahead of the #AsiaCup2022 🤩
A high-profile meet and greet on the sidelines 👏 pic.twitter.com/c5vsNCi6xw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 25, 2022
पंत आणि आफ्रिदीची झाली भेट
विराटनंतर आफ्रिदीची रिषभ पंतशीही भेट झाली. विराटनंतर आलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) सोबत बोलताना आफ्रिदी मजेशीर अंदाजात बोलताना दिसला. पंतशी चर्चा करताना आफ्रिदी म्हणाला, “मला तुमच्याकडून फलंदाजी शिकायची आहे. आजकाल एका हाताने खूप षटकार मारत आहात.”
यावर पंत त्याच्या दुखापतीकडे पाहून म्हणाला की, “यामध्येच खूप मेहनत घ्यावी लागत आहे. आता वेगवान गोलंदाज आहात, तर मेहनत घ्यावी लागणारच.” त्यानंतर दोघांमध्ये इतर काही मुद्यांवर चर्चा झाली आणि पंत सरावासाठी मैदानात गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानला दुखापतींचे ग्रहण, आफ्रिदीनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल
आशिया चषकापूर्वी धोनीच्या आठवणीत कोहली भावूक; म्हणाला, ‘७+१८, आमची भागीदारी…’
ENGvSA: दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस साहेबांचा; अँडरसन-ब्रॉड चमकले