---Advertisement---

‘मिशन एशिया कप’ फत्ते करण्यासाठी कोहलीने बनवलाय प्लॅन, मुंबईतून करणार सुरुवात

On: मंगळवार, ऑगस्ट 9, 2022 4:53 PM
virat-kohli
---Advertisement---

मंगळवारी (०९ ऑगस्ट) बीसीसीआयने आशिया चषक २०२२ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात टी२० संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. दिर्घ काळाच्या विश्रांतीनंतर विराटचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अशात पुनरागमनानंतर आता भारतीय संघाला आठव्यांदा आशिया चषक जिंकून देण्यासाठी तयारीला लागला आहे. यासाठी त्याने योजनाही आखली असून याची सुरुवात याच आठवड्यात मुंबईतील मैदानांवर होऊ शकते. 

भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराटने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली होती. परंतु आता आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून तो भारतीय संघात पुनरागमन करेल. अशात सुट्टीनंतर खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी विराट नेट्समध्ये कसून घाम गाळणार आहे.

मुंबईत विराट करणार क्रिकेटचा सराव
माध्यमातील वृत्तांनुसार, विराट या आठवड्यात आशिया चषकासाठी सरावाला सुरुवात करू शकतो. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये स्थित एमसीएस इनडोर अकादमीत तो फलंदाजीचे धडे गिरवू शकतो. तिथून विराटचे घरही जवळ असल्याने तो या अकादमीत सराव करण्याला प्राधान्य देऊ शकतो. वर्लीत राहणाऱ्या विराटपासून एमसीए अकादमी २० मिनिटांच्या अंतरावरच आहे. तत्पूर्वी विराटने त्याच्या घरातील जीममध्ये फिजिकल ट्रेनिंगला सुरुवातही केली आहे.

आशिया चषकासाठी असे आहेत भारताचे वेळापत्रक
आशिया चषकात भारतीय संघ त्यांचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी खेळेल. हा सामना दुबईत पाकिस्तानविरुद्ध होईल. त्यानंतर ३१ ऑगस्टला दुबईत दुसरा सामना रंगेल. हा सामना आशिया चषकासाठी पात्र ठरणाऱ्या संघासोबत होईल. या सामन्यांच्या निकालावरून भारतीय संघ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करेल की नाही, हे निश्चित होईल.

भारतीय संघ आशिया चषकातील गट अ चा भाग आहे. भारताबरोबरच पाकिस्तान आणि क्लालिफाय होणारा संघही या गटाचा भाग असेल. त्यामुळे भारतीय संघासाठी हे दोन्ही सामने जिंकत पुढील टप्प्यात पात्रता मिळवणे जास्त कठीण नसेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘रवी शास्त्रींच्या आहेत खूप मोठ्या ओळखी!’, नवीन इंस्टा पोस्ट होतीये व्हायरल

पुनित बालन गृप प्रस्तुत ४९वी राज्यस्तरिय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धा नाशिकमध्ये

एशिया कपमध्ये टीम इंडियासाठी पाकिस्तान नाही तर ‘हा’ संघ ठरतोयं डेंजर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---