आयपीएल 2026 मध्ये 10 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात सामना खेळला जाईल. आरसीबी सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, तर मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीवर (Virat Kohli) सर्वांच्या नजरा असणार आहेत. तो या सामन्यात इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केल्या आहेत. त्याने 972 धावा केल्या आहेत. तर, या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर कोहलीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात केवळ 6 धावा केल्या, तर तो मुंबईविरुद्ध आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. कोहलीच्या नावावर सध्या 972 धावा आहेत. या यादीत शिखर धवन 901 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर सुरेश रैना 834 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच, मनीष पांडे 796 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली (Virat Kohli) या हंगामामध्ये अप्रतिम फलंदाजी करत आहे.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 10 सामन्यांच्या 10 डावांत 47.37 च्या सरासरीने 379 धावा केल्या आहेत. किंग कोहलीने 3 अर्धशतके आपल्या नावावर केली आहेत. याशिवाय विराट कोहली एकूण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 277 आयपीएल सामन्यांमध्ये 39.82 च्या सरासरीने 9040 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये 8 शतकांव्यतिरिक्त 66 अर्धशतकांचा समावेश आहे.






