आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१० मे) पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा खेळला गेला. चेपॉकवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोश इंग्लिसने स्फोटक खेळी केली. त्याने ३३ चेंडूत चौकार-षटकारांची बरसात केली, मात्र तो शतकापासून केवळ १५ धावा मागे राहिला. त्याने ८५ धावा करताना १० चौकार आणि ६ षटकार मारले. त्याने पॉवरप्लेच्या २५ चेंडूंमध्येच ७७ धावा केल्या होत्या. त्याचे शतक हुकले असले तरी एका विशिष्ट यादीत त्याने आपले नाव नोंदवले आहे.
आयपीएल सामन्याच्या पॉलरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लिसने चौथे स्थान पटकावले आहे. त्याने माजी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ऍडम गिलक्रिस्टला मागे टाकले. गिलक्रिस्टने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना दिल्ली डेयरडेविल्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ७४ धावा केल्या होत्या. तसेच आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ८७ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर सनरायझर्स हैद्राबादच्या ट्रेविस हेडचा क्रमांक लागतो. त्याने २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या.
आयपीएल पॉवरप्लेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा
८७ – सुरेश रैना (२०१४)
८४ – ट्रेविस हेड (२०२४)
७८ – जेक फ्रेझर-मॅकगर्क (२०२४)
७७ – जोश इंग्लिस (२०२६)
७४ – ऍडम गिलक्रिस्ट (२००९)
७१ – प्रभसिमरन सिंग (२०२६)
६६ – अभिषेक शर्मा (२०२६)
६४ – फाफ डु प्लेसिस (२०२४)
६३ – इशान किशन (२०२१)
६२ – यशस्वी जायस्वाल (२०२३)
सामन्याची स्थिती पाहिली तर एलएसजीने इंग्लिसच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ८ विकेट्स गमावत २०३ धावा केल्या. यामध्ये शहबाज अहमदने २५ चेंडूंत नाबाद ४३ धावा केल्या. सीएसकेकडून जेमी ओव्हरटनने प्रभावी कामगिरी केली. त्याने एकाच षटकात इंग्लिस आणि रिषभ पंत यांच्या विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.





