---Advertisement---

4.50 कोटींची एक विकेट! आयपीएल मधील या 5 खेळाडूंनी संघाचे केले मोठे नुकसान

On: गुरूवार, मे 28, 2026 7:07 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने पूर्ण झाले आहेत. तर प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने बाजी मारून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर क्वालिफायर २ चा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या हंगामात युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काही खेळाडूंनी दमदार गोलंदाजी करून भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. तर काही स्टार गोलंदाज आहेत, जे या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. यापैकी काही गोलंदाजांवर कोटींची बोली लागली होती. कोण आहेत ते गोलंदाज? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत अव्वल स्थानी आहे. जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सने १८ कोटींची बोली लावून रिटेन केलं आहे. या हंगामात त्याला केवळ ४ गडी बाद करता आले आहेत. विकेट्स आणि त्याला मिळालेल्या रकमेचं गणित जुळवलं. तर त्याने घेतलेल्या एक विकेटची किंमत ही ४.५० कोटी इतकी आहे.

दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटींची बोली लावून संघात घेतलेल्या टी नटराजनला देखील या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या हंगामात त्याने केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीला त्याचा एक विकेट २.१५ कोटींना पडला आहे. टी नटराजन अनुभवी गोलंदाज आहे. अशा गोलंदाजाकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पंजाब किंग्स संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत त्याने १२ विकेट्स घेतल्या आहेत. या हिशोबाने त्याचा एक विकेट हा पंजाब किंग्ससाठी १.५० कोटी इतका महाग ठरला.

कॅमरून ग्रीन हा या स्पर्धेतील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २५.२० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. पण तो मिळालेल्या मानधनाला मान देऊ शकलेला नाही. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना या हंगामात ७ गडी बाद केले आहेत. यावरून त्याच्या एका विकेटची किंमत ३.६० कोटी रुपये इतकी आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबईने १६.३५ कोटींची बोली लावून संघात स्थान दिलं. पण या हंगामात त्याला केवळ ४ गडी बाद करता आले आहेत. यावरून त्याने घेतलेल्या एका विकेटची किंमत ही ४.०९ कोटी इतकी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---