भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले.
गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य देणार आहे. ज्याचा उपयोग त्याला निश्चित आगामी दौऱ्यात होणार आहे.
कोहलीच्या सरेकडून खेळण्याची जोरदार चर्चा सध्या भारतात होत आहे. भारताचा एवढा मोठा स्टार आणि व्यस्त खेळाडू काऊंटी खेळत असल्यामुळे भारताप्रमाणेच याची इंग्लंडसह क्रिकेट विश्वात मोठी चर्चा आहे.
संपुर्ण जुन महिना हा खेळाडू सरेकडून खेळणार असल्याची घोषणा झाल्यामुळे या काळात जे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत त्यातही हा खेळाडू भाग घेणार नाही.
विराट या काळात एक कसोटी आणि दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांना मुकणार आहे. यामुळे विराटला सरेकडून नक्की किती पैसे मिळणार आहे याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
परंतु बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार विराटला या करारातुन अतिशय कमी मानधन मिळणार आहे. कारण स्वत: विराट आणि बीसीसीआय या स्पर्धेत उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देत आहे.
त्यामुळे पैसे ही नगण्य गोष्ट आहे. विराटला जाण्यायेण्याचे पैसे ज्याला ट्रॅव्हलिंग अलाउॅंस असे म्हटले जाते तो, राहण्याचे पैसे तसेच थोडी मॅच फी असे एकुण मानधन मिळणार आहे.
विराटच्या लोकप्रियतेचा उपयोग सरेसाठी नक्की होणार असला तरी विराट मात्र खेळावरच लक्ष देणार आहे.
विराट जून महिन्यात सरेकडून ३ एकदिवसीय सामने तर ३ चार दिवसीय सामने खेळणार आहे.
गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय केलेला माॅर्ने माॅर्केल हा विराटचा येथे संघसहकारी असणार आहे.