भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुरू असलेल्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेत खेळत नाही. विराटला सततचे दौरे आणि त्याच्यामुळे शरीरावर येणाऱ्या ताणामुळे विश्रांती मिळावी म्हणून संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तरी देखील विराटची चर्चा काही कमी होत नाही.
भारतीय संघाचे रनमशीन असलेला विराट आता बॉलिवूड मधील सुपरस्टार होणार आहे का काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे संबध जवळचे आहेत हे आपल्याला माहीत आहेच. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही हिंदी सिनेसृष्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माती आहे.
विराट कोहली या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवणार आहे का नाही ह्याची अजून पुष्टी व्हायची आहे. विराटने त्याच्या सोशल मिडियवरून “ट्रेलर: द मुव्ही”…….10 वर्षानंतरचे दुसरे पदार्पण, आता थांबू नाही शकत. अश्या स्वरूपातील आशय पोस्टरसह प्रसिध्द केला आहे.
Another debut after 10 years, can't wait! 😀 #TrailerTheMovie https://t.co/zDgE4JrdDT pic.twitter.com/hvcovMtfAV
— Virat Kohli (@imVkohli) September 21, 2018
पोस्टर वरून हा सेनेमा, जाहिरात की लघुपट आहे हे कळणे अवघड आहे. पोस्टरमध्ये विराट त्याच्या नेहमीच्या म्हणजे ऍक्शन अवतारात दिसतो आहे.
या पोस्टरमध्ये विराट याचा निर्माता देखील दिसतो आहे. त्याचा ब्रँड, राँगच्या नावाखाली याची निर्मिती झाल्याचे दिसते आहे.
विराट सध्या इंग्लडच्या प्रदीर्घ दौऱ्यानंतर विश्रांती घेत असला तरी देखील तो आपल्या ब्रॅंड राँगच्या प्रसिध्दी मध्ये गुंतलेला दिसतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: टीम इंडियाला या कारणांमुळे बांगलादेश करु शकतो पराभूत
–राशीद खान विषयी माहित नसलेल्या काही खास गोष्टी
-फक्त ख्रिस गेल आणि रोहित शर्मानेच असा कारनामा केलायं