इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच एक मोठी बातमी समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली चालू आयपीएल हंगामानंतर कर्णधारपद सोडणार आहे. आरसीबीने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे. असे असले तरी पुढील हंगामापासून तो केवळ फलंदाज म्हणून खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विराटची प्रतिक्रिया लिहिली आहे. त्यात विराट म्हणतो की ‘आरसीबीचा कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. मी माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत आरसीबीचा खेळाडू म्हणून खेळणे मात्र, सुरु ठेवेल. मी आरसीबी चाहत्यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पाठिंबा दिला.’
Virat Kohli to step down from RCB captaincy after #IPL2021
“This will be my last IPL as captain of RCB. I’ll continue to be an RCB player till I play my last IPL game. I thank all the RCB fans for believing in me and supporting me.”: Virat Kohli#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/QSIdCT8QQM
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 19, 2021
विराट या व्हिडिओमध्ये म्हटला की ‘हॅलो, संपूर्ण आरसीबी फॅमिली, बेंगलोरचे अप्रतिम चाहते आणि त्या सर्वांना जे आम्हाला पाठिंबा देतात. मी एक घोषणा करणार आहे. मी संध्याकाळी व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे, बऱ्याच काळापासून ही गोष्ट माझ्या मनात होती. आरसीबीचा कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. मी माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत आरसीबीचा खेळाडू म्हणून खेळणे सुरु ठेवेल. मी आरसीबी चाहत्यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पाठिंबा दिला.’
पुढे विराट म्हणाला, ‘मी पार पाडत असलेल्या जबाबदाऱ्यांसाठी वचनबद्ध होण्यासाठी मला सक्षम व्हायचे आहे आणि मला वाटते की मला ताजेतवाने होण्यासाठी, पुन्हा सज्ज होण्यासाठी आणि पुढे कसे जाता येईल हे स्पष्ट ठरवण्यासाठी माझा वेळ हवा आहे. ९ वर्षांची हा सुंदर प्रवास होता. यात आंनंदाचे आणि त्रासाचे, सुखाने आणि दु:खाचे क्षण होते.’
विराट २००८ पासून आरसीबीकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये पहिल्या हंगामापासून आत्तापर्यंतएकाच संघाकडून खेळणारा विराट एकमेव खेळाडू आहे. त्याने २०११ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आरसीबीचे ३ सामन्यांत डॅनिएल विट्टोरीच्या अनुपस्थितीत पहिल्यांदा नेतृत्व केले होते. त्यावेळी तो आयपीएलमधील सर्वात युवा कर्णधार बनला होता. त्यानंतर त्याने २०१३ सालापासून आरसीबीचे नियमित कर्णधारपद सांभाळले.
त्याने आत्तापर्यंत १३२ सामन्यांत आरसीबीचे नेतृत्व केले असून ६० सामन्यांत विजय मिळवले असून ६५ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ साली आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना सनरायझर्स हैदराबाकडून पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
विराटने यापूर्वीच घोषणा केली आहे की तो टी२० विश्वचषक २०२१ नंतर भारताच्या टी२० संघाचेही नेतृत्व सोडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल अकरा वर्षांनंतर धोनी बाद झाला पावर-प्लेमध्ये, ‘या’ गोलंदाजाने प्रथम केले होते बाद
चेन्नईविरूद्ध मैदानात उतरताच जस्सीने केला खास कारनामा
रोहित शर्मा ‘या’ कारणामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यातून झाला बाहेर