भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे, उभय संघातील टी20 मालिकेतून भारताचे वरिष्ठ खेळाडू बाहेर पडले आहेत. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशात संघाची धुरा टी20चा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भारताने 2021पासून आतापर्यंत तब्बल 8 कर्णधार बदलले आहेत. अशात सूर्या भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करणारा 9वा कर्णधार बनणार आहे. चला तर, सूर्यापूर्वी 2021पासून टी20त भारताचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहूयात…
तब्बल 8 कर्णधार बदलले
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Austalia) संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारताचा कर्णधार असेल. खरं तर, 2021पासून भारतीय टी20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणारा सूर्या 9वा खेळाडू असेल. त्यापूर्वी 2021पासूनची यादी पाहिली, तर अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) भारतीय टी20 संघाचा कर्णधार होता. त्याने निवृत्तीपूर्वी 2021मध्ये एकूण 10 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात संघाला 6 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विराटनंतर दुसऱ्या स्थानी शिखर धवन (Shikhar Dhawan) आहे. त्याने फक्त 3 सामन्यात संघाचे नेतृत्व केले, त्यात त्याला फक्त 1 सामना जिंकता आला, तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) असून त्याने 2021 ते 2022 भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करताना 32 सामने खेळले. त्यातील 24 सामन्यात संघाला विजय, तर 8 सामन्यात पराभव पत्करावा लागला.
याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी रिषभ पंत असून त्याने 2022मध्ये 5 टी20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना संघाला 2 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला. एक सामना अनिर्णित राहिला होता. तसेच, पाचव्या स्थानी हार्दिक पंड्या असून त्याने 2022 ते 2023 यादम्यान 16 सामन्यात भारतीय टी20 संघाचे नेतृत्व केले. त्यातील 10 सामन्यात संघाला विजय, तर 5 सामन्यात पराभव आणि 1 सामना बरोबरीत सुटला. यानंतर सहाव्या स्थानावरील केएल राहुल याने 2022मध्ये 1 टी20 सामन्यात संघाचे नेतृत्व केले. तो सामना भारत जिंकला.
Suryakumar Yadav is set to be the ninth man to lead India in a T20I since the start of 2021 😲 pic.twitter.com/V3DX2c80hQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 22, 2023
सातव्या स्थानी जसप्रीत बुमराह आहे. त्याने 2023मध्ये 2 टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यावेळी संघाने दोनही सामने जिंकले. यादीत आठव्या स्थानी ऋतुराज गायकवाड आहे. त्याने 2023 मध्ये 3 टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवता आला, तर 1 सामना अनिर्णित ठरला. अशात आता सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करताना कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (virat kohli to suryakumar yadav team india have fielded 9 captains in t20is since 2021 see list here)
हेही वाचा-
INDvsAUS T20 मालिकेतील पहिला सामना कुठे, कधी आणि कसा पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर
क्या से क्या हो गया! फक्त 2 पत्रकारांनी लावली सूर्याच्या प्रेस कॉन्फरन्सला हजेरी, फक्त 3.5 मिनिटात…