---Advertisement---

विराटच्या रिटायरमेंटची तारीख ठरली! सर्वोच्च स्थानी असतानाच घेणार निर्णय

On: मंगळवार, नोव्हेंबर 21, 2023 4:44 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा समारोप झाला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. या स्पर्धेत भारताचा विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच स्पर्धेचा मानकरी म्हणून देखील त्याला पुरस्कार देण्यात आला. या सर्व गोष्टी घडत असतानाच, विराटच्या भविष्याबद्दलची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

भारताच्या विश्वचषकातील पराभवानंतर विराट कोहली हा आणखी किती दिवस क्रिकेट खेळेल याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र, सोशल मीडियावर 2016 मध्ये पोस्ट करण्यात आलेल्या विराटबाबतच्या एका भविष्यात त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तंतोतंत घडल्याचे दिसून येते. यामध्येच विराट निवृत्ती कधी घेणार याचा देखील उल्लेख केला गेला आहे.

या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे ‘विराट सध्या करत असलेली दमदार कामगिरी अशीच चालू ठेवणार आहे. ऑगस्ट 2025 ते जानेवारी 2017 पर्यंत त्याच्या कारकीर्दीत थोडासा उतार येईल. मात्र, त्यानंतर तो पुन्हा एकदा मुसंडी मारेल आणि संघासाठी योगदान देईल. तर मार्च 2018 मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर असताना तो निवृत्त होईल.’

याच पोस्टमध्ये विराटच्या आयुष्यातील यापूर्वीच्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. यामध्ये विराटचे लग्न व मुलीच्या जन्माची तारीख देखील सांगितली होती. तसेच विराट कोणत्या काळात सर्वोत्तम खेळणार व कोणत्या काळात तो निराशाजनक कामगिरी करणार हे देखील अगदी अचूक सांगितले गेले आहे.

वरील भविष्याचा अंदाज घेतल्यास विराट हा भारतासाठी 2027 वनडे विश्वचषक खेळण्याची दाट शक्यता आहे. तसेच या ज्योतिषात उल्लेख केल्याप्रमाणे त्यावेळी भारत विश्वविजेता देखील होऊ शकतो.

(Stars And Astrology Predicts Virat Kohli Future In 2016 Now Predict His Retirement)

हेही वाचा-
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---