किंग कोहली देणार रायगड किल्ल्याला भेट…!!!

पुणे। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने रायगड किल्ल्याला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याची माहिती राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसलेंनी फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे.

विराटने संभाजीराजे भोसलेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान विराटबरोबर झालेल्या चर्चेबद्दलही संभाजीराजे भोसलेंनी फेसबूक पोस्टवर माहिती दिली आहे. तसेच त्यांनी विराटबरोबरचा या भेटीदरम्यानचा फोटोही शेअर केला आहे.

त्यांनी विराटबरोबर महाराष्ट्रातील क्रिकेटबद्दलही चर्चा केली असल्याचे सांगताना या पोस्टमध्ये म्हटले आहे की “भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य ‘जतीन परांजपे’ यांनी ही भेट घडवून आणली.”

“आमच्या भेटीआधी जतीननी माझ्या सामाजिक कार्याविषयी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी मी करत असलेल्या कामाची माहिती सांगून ठेवली असेल कदाचित.
त्यामुळे, विराट नि स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची ईच्छा व्यक्त केली.”

विराट कोहली सोबत महाराष्ट्राच्या क्रिकेट वर बोललो.भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य 'जतीन परांजपे' यांनी ही भेट…

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 12, 2019

विराट सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. 3 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने दोन सामन्यांनंतर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे सुरु होणार आहे.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.