बांगलादेश आणि भारत यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. उभय संघांतील हा सामना ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाचे फलंदाजी आक्रमण या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले. विराट कोहली मागच्या काही सामन्यांपासून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला असतानाही त्याला अवघ्या 9 धावांवर विकेट गमवावी लागली. विराट फलंदाजीत महत्वाचे योगदान देऊ शकला नाही, पण क्षेत्ररक्षण करताना मात्र त्याने महत्वाचा झेल घेत सामन्यावर प्रभाव पाडला.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्यामुळे भारत अवघ्या 186 धावांवर गुंडाळला गेला. संघाला त्यांची 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) मात्र चांगल्या लयीत दिसला. राहुलने 70 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. भारताचा दुसरा एखही फलंदाज 30 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले.
असे असले तरी, विराट कोहलीचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. विराटच्या कौतुकाचे कारण म्हणजे त्याने घेतलेला एक अप्रतिम झेल. बांगलादेशचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या सामन्यात 29 धावा करून विराटच्या हातात झेलबाद झाला. ही विकेट वॉशिंगटन सुंदर याच्या नावावर झाली. बांगलादेशच्या डावातील 24 व्या षटकात सुंदर गोलंदाजी करत होता, ज्याने षटकातील तिसऱ्या चेंडूवर विकेट गमावली. शाकिबला बाद करण्यासाठी विराटने एक जबरदस्त झेल पकडला, जो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
https://twitter.com/_ratna_deep/status/1599367880956858368?s=20&t=5wAYIZQGueTmbgtJKziwKA
"They said I was out of form" 😉#ViratKohli #BANvIND #INDvsBAN pic.twitter.com/C5du1wCqih
— Gaurav Gambhir (@GauravGambhir16) December 4, 2022
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर बांगलादेशसाठी शाकिब अल हसन सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे. त्यांने या सामन्यात गोलंदाजी करताना टाकेलल्या 10 षटकांमध्ये 36 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक पाच विकेट्स नावावर केल्या. शाकिबच्याच साथीने इबादत हुसैन याने 47 धावा खर्च करत 4 विकेस्ट नावावर केल्या. (Virat Kohli took an amazing catch of Shakib Al Hasan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ढाकाच्या मैदानावर शाकिबचा इतिहास, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना पाडले मागे
आठ महिन्यांपूर्वी कोणाला माहित नसलेला कुलदीप सेन आज टीम इंडियासाठी खेळतोय