वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. बेंगलोर येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले. फलंदाजांनी 410 धावा उभारल्यानंतर गोलंदाजांनी देखील नियमित अंतराने बळी मिळवले. त्याचवेळी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने देखील गोलंदाजीत हात आजमावत एक बळी आपल्या नावे केला.
भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजांनी नेदरलँडचे वरच्या फळीतील फलंदाज बाद केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पार्टटाइम गोलंदाजांना गोलंदाजी दिली. भारतीय डावातील 25 षटक टाकत असताना विराट कोहली याने नेदरलँड्सला चौथा धक्का दिला. विराटने विरोधी कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने तब्बल नऊ वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये बळी मिळवला.
https://www.instagram.com/reel/CzjLFC3Pof2/?igshid=cWJxcnA4bjcxd2hp
विराटने आत्तापर्यंत आपल्या वनडे कारकिर्दीत पाच बळी मिळवले आहेत. त्याने यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक, इंग्लंडचाच क्रेग किस्वेटर, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम व दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक यांना बाद केलेले.
(Virat Kohli Took ODI Wicket After 9 Years He Took Wicket Of Netherlands Captain)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल