---Advertisement---

‘कोहलीला ड्रिम इलेव्हनचा कॅप्टन करा अन् रहाणेला टीम इंडियाचा’ विराटवर टीका करताना अजिंक्यला कर्णधार करण्याची होतेय मागणी

---Advertisement---

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराजयाचा सामना करावा लागला होता. पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व हे विराट कोहलीनेच केले होते. त्यानंतर विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. उर्वरित तीन कसोटी सामन्यात संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणे याने सांभाळली होती.आणि उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाला २-१ ने विजय मिळवून दिला. आता सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. परंतु पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच गेल्या ४ कसोटी सामन्यात विराटच्या नेतृत्त्वाखाली संघाला पराभव पाहायला लागला आहे. याचमुळे विराटला आता टीकेचे धनी व्हावे लागत आहे.

अशातच सोशल मीडिया वर विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून अजिंक्य रहाणे याला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचे कारण असे की, अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावत विजय मिळवून दिला होता. त्यांनतर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता आणि मालिकेतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देत मालिका जिंकली होती.

या कसोटी मालिकेत रहाणेचे नेतृत्त्व गुण सर्वांसमोर आले होते. तसेच त्याच्या याच गुणांचे कौतूक देखील झाले होते. त्याने वेळोवेळी गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात योग्य बदल केले होते. संघाला गरज असेल तिथे फलंदाजीत बदल व योग्य खेळाडूंना संघात स्थान दिले होते. याच पार्श्वभूमीवर आता रहाणेला कर्णधार करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

https://twitter.com/ComeToGabbaMate/status/1359057263789441025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1359057263789441025%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Farticle%2Fvirat-kohli-trolled-ajinkya-rahane-deserves-captaincy-after-england-kohlis-4th-loss-as-captain-india-vs-england-1st-test%2F718015

‘रहाणेने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नेटमध्ये गोलंदाज घेऊन पराभूत केले. विराट चांगले गोलंदाज व फलंदाज घेऊनही इंग्लंडला भारतात पराभूत करु शकत नाही. विराटची रॉयल चॅलेंजर बेंलगोर आयपीएलमधून कायम पहिल्यांदा बाहेर पडते. तो एक चांगला कर्णधार नसल्याचा हा पुरावा आहे, ‘ असा एक चाहता ट्विटमध्ये म्हटला आहे.

‘विराटला ड्रीम ११चा कर्णधार बनवा व रहाणेला टीम इंडिया,’ असा ट्विट एका चाहत्याने केला आहे.

https://twitter.com/tweeterkmkb/status/1359054432533585920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1359054432533585920%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Farticle%2Fvirat-kohli-trolled-ajinkya-rahane-deserves-captaincy-after-england-kohlis-4th-loss-as-captain-india-vs-england-1st-test%2F718015

‘भारतीय संघाचा चेन्नईला पराभव झाला. विराट कोहलीने कर्णधारपदी कायम राहिला तर आणखी एक पराभव पाहावा लागेल. रहाणेला परत कर्णधार करा,’ असंही एका चाहत्याने म्हटलं आहे.

https://twitter.com/Mohit1717/status/1359057484925796354?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1359057484925796354%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Farticle%2Fvirat-kohli-trolled-ajinkya-rahane-deserves-captaincy-after-england-kohlis-4th-loss-as-captain-india-vs-england-1st-test%2F718015

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागील ४ कसोटी सामने गमावले आहेत. यात न्यूझीलेंड दौऱ्यातील २ कसोटी सामन्यातील पराजय, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभव आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा समावेश आहे. तसेच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवले तर १ सामना अनिर्णित राहिला आहे.

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर झाले नाराज, तडकाफडकी दिला उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

‘गोरी तेरी आँखें कहें’, युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबतचा रोमँटिक लूक भन्नाट व्हायरल, पाहा फोटो

पराभवानंतर साडेसाती..! अष्टपैलू रविंद्र जडेजा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर? महत्वाची माहिती समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---