---Advertisement---

लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट

On: शनिवार, नोव्हेंबर 7, 2020 11:05 AM
---Advertisement---

शुक्रवारी(६ नोव्हेंबर) आयपीएल २०२० मध्ये झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे बेंगलोरचे आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या पराभवानंतर बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक खास ट्विट करत चाहत्यांचे संघाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

विराटने ट्विट केले की ‘प्रत्येक चढ-उतारात एकत्र होतो. एक संघ म्हणून आपला हा प्रवास शानदार होता. हो नक्कीच काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या नाही, पण एक संघ म्हणून अभिमान आहे. आमच्या सर्व चाहत्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. तूमचे प्रेम आम्हाला मजबूत बनवते. लवकरच भेटू.’

विराटने या ट्विटबरोबर संपूर्ण संघाचाही एक फोटो शेअर केला आहे. विराट आयपीएलच्या सर्व हंगामात बेंगलोर संघाकडूनच खेळला आहे. तसेच २०१३ पासून तो या संघाचा नियमित कर्णधारही आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी केली होती. पण हैदराबादच्या गोलंदाजीसमोर त्यांना २० षटकात केवळ १३१ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ५६ धावा केल्या. तर विराटला मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले तो केवळ ६ धावा करुन बाद झाला. बेंगलोरने दिलेल्या १३२ धावांचे आव्हान हैदराबादने केन विलियम्सनच्या नाबाद ५० धावांच्या खेळीच्या जोरावर १९.४ षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या –

सलग १३ व्या वर्षीही RCB च्या पदरी निराशाच, पाहा काय सांगतो इतिहास

‘नवीन JCB घेण्याच्या विचारात RCB चा मालक’, बेंगलोरच्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस

दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला डच्चू

ट्रेंडिंग लेख –

मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---