भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मातून जात आहे. रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट साध्या दुहेरी धावा करण्यासाठीही झुंजताना दिसत आहे. अशात काही आजी-माजी क्रिकेटपटू त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करत असून काही त्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अशात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हटल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हा विराटच्या समर्थनात धावून आला आहे. यानंतर आता विराटने आझमला आपल्याला पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद म्हटले आहे.
अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या विराटच्या (Virat Kohli) समर्थनार्थ पाकिस्तानचा कर्णधार आझमने (Babar Azam) ट्विट केले आहे. त्याने लिहिले की, ‘हा टप्पाही निघून जाईल. खंबीर राहा.’ या ट्वीटसोबत त्याने विराट आणि स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये माजी भारतीय कर्णधार त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे.
तसेच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत याबद्दल विचारले गेले असता आझम म्हणाला की, ‘मला वाटते की, विराटला सध्या पाठिंब्याची गरज आहे. मी त्याला प्रोत्साहन देणारे ट्वीट केले आहे. कारण एक खेळाडू म्हणून मला वाटते की, तो एका अशा कालावधीतून जात आहे, ज्यात त्याला पाठिंब्याची गरज आहे.’
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
आझमच्या या कठिण परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभ्या राहण्याच्या कृतीचे विराटकडून स्वागत करण्यात आले आहे. विराटने आझमच्या ट्वीटला प्रत्युत्तर देताना त्याने आभार व्यक्त केले आहेत. ‘धन्यवाद. असाच चमकत राहा आणि मोठा हो. माझ्या तुला शुभेच्छा,’ असे विराटने म्हटले आहे.
Thank you. Keep shining and rising. Wish you all the best 👏
— Virat Kohli (@imVkohli) July 16, 2022
दरम्यान विराटसाठी सध्या चालू असलेला इंग्लंड दौराही अपेक्षित राहिलेला नाही. तो पहिल्या वनडे सामन्यासाठी उपस्थित नव्हता. त्यानंतर दुसरा वनडे सामना खेळताना तो फक्त १६ धावा करू शकला. तर टी२० मालिकेत २ सामन्यात त्याला फक्त १२ धावा करता आल्या. यातही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ११ धावा इतकी राहिली. तत्पूर्वी पाचव्या कसोटी सामन्यातही त्याने निराशाच केली. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने फक्त ३१ धावा केल्या होत्या.
याखेरीज विराटच्या आयपीएल २०२२ मधील आतापर्यंतच्या प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, तिन्ही स्वरूपात मिळून त्याने १५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २५.५० च्या सरासरीने तो ४५९ धावाच करू शकला आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ७९ धावा इतकी राहिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते ‘या’ पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित
मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत
निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे