भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज (5जुलै) त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी भावना कोणती याबद्दल ट्विट करुन सांगितले आहे.
विराटने ट्विट केले आहे की, “देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संघसहकाऱ्यांसोबत मैदानात जाणे ही सर्वात रोमांचकारी भावना आहे. प्रेक्षकांचा पाठिंब्यामुळे जी उर्जा मिळते त्याला व्यक्त करता येणार नाही.”
या ट्विटबरोबरच विराटने एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात मैदानात जाण्यापुर्वी केएल राहुल, रोहित शर्मा आणि एमएस धोनी बोलत आहेत. तर विराट मैदानाकडे पाहत उभा आहे.
The most exciting feeling is walking out with your team mates to represent your country. The passion of fans creates a kind of energy that can't be explained. 👌👌 pic.twitter.com/7YYb9NV44M
— Virat Kohli (@imVkohli) July 5, 2018
विराटने नुकतेच 3 जुलैला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याचबरोबर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2000 धावा करणारा मिताली राज नंतरचा दुसराच क्रिकेटपटू आहे.
त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 60 सामन्यात 49.07 च्या सरासरीने 2012 धावा केल्या आहेत.
भारताच्या इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात
भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असुन 3 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मँचेस्टर येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या मालिकेतील दुसरा टी20 सामना कार्डिफ येथे उद्या, 6 जुलैला होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सुरवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक
-बल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..