वनडे विश्वचषक व त्यानंतर आता सुरू असलेल्या टी20 मालिकेचा समाप्तीनंतर पुढील महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वाच्या दौऱ्याबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचेल. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाला तीन टी20, तीन वनडे व दोन कसोटी सामने खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 30 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या मोठ्या दौऱ्यासाठी भारताचे काही प्रमुख खेळाडू मात्र विश्रांती घेऊ शकतात.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने बीसीसीआयला कळवले आहे की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी20 व वनडे मालिकेसाठी त्याचा विचार करू नये. आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी विराटने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जातेय. तो थेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल. विशेष म्हणजे भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
त्याचप्रमाणे भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील दौऱ्यावरील टी20 मालिकेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. वनडे विश्वचषकात रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. भारतीय संघाला पुढील वर्षी टी20 विश्वचषक खेळायचा आहे. तत्पूर्वी, भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करू शकतो. तो सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
(Virat Kohli Unavailable For ODI And T20 Series On South Africa Tour)
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…
‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन