पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याच्या पाकिस्तान संघाकडून पुन्हा खेळण्याच्या निर्णयावर संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद हाफीज यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हाफिजच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद आमिर यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. हाफिजने सांगितले की, त्याने स्वतः मोहम्मद आमिरला फोन केला होता आणि त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून पुनरागमन करण्यास सांगितले होते, परंतु त्याने नकार दिला.
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर ( Mohammad Amir) याने मानसिक छळाचे कारण देत डिसेंबर 2020 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा होते, ज्यांनी पाकिस्तान क्रिकेटसाठी एकेकाळी फिक्सिंगसारखे काम केले असेल, त्याला पुन्हा संघात खेळण्याची संधी मिळू नये, असं रमीझ राजा म्हणाले होते. त्यामुळे आमिरला त्यांच्या कार्यकाळात परत खेळण्याची संधी मिळाली नाही. खुद्द मोहम्मद आमिरनेच सांगितले होते की, रमीझ राजा अध्यक्ष असताना पाकिस्तान संघात परतणार नाही आणि ते गेल्यानंतरच याबाबत विचार करू.
आता मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) याची पाकिस्तान संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना हाफीज म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या मोहम्मद आमिरला फोन केला आणि त्याला सांगितले की, जर तुला पाकिस्तानसाठी खेळायचे असेल तर तू तुझी निवृत्ती परत घेऊ शकतो. तुला व्यवस्थेत परत यावे लागेल. जर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याची निवड गुणवत्तेवर केली जाईल. आता तो या सर्व गोष्टींच्या पलीकडे गेल्याचे त्याने मला सांगितले आहे.”
मोहम्मद आमिरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 61 वनडे सामने खेळले त्यात त्याने 81 विकेट्स घेतल्या होत्या. तर 36 कसोटीत 119 विकेट्स आणि 50 टी20 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या आहेत. (Mohammad Hafeez’s big statement on Aamir’s international comeback Said I myself told him)
महत्वाच्या बातम्या
मुंबईच्या गोलंदाजाचे आरसीबी चाहत्यांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आरसीबीचे चाहते नेहमीच…’
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितची बादशाहत संपली! ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे भारतीय कर्णधाराची डोकेदुखी वाढली






