भारतीय संघाचे दोन माजी दिग्गज विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विराट कोहलीने आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासूनच विराट आणि गांगुली यांच्यातील वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळते. आता विराटने सोशल मीडियावर उचललेले एक पाऊल या वाद पुन्हा पेटवण्यासाठी हवा देत आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले. सध्या गांगुली आयपीएलमध्ये दिल्ली कॅफिटल्सच्या डायरेक्टरची भूमिका पार पाडत आहेत. शनिवारी (15 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलर (RCB vs DC) यांच्यातील सामन्यावेळीही गांगुली मैदानात उपस्थित होते. बेंगलोरमध्ये खेळल्या गेलल्या या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने आरसीबीसाठी 34 चेंडूत 50 धावा केल्या. आरसीबीने आपल्या होम ग्राउंडवरील हा सामना 23 धावांनी जिंकला. विजय मिळवल्यानंतर विराटने दिल्लीच्या सर्व खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफशी हात मिळवला. पण गांगुलींसोबत त्याने हात मिळवला नाही.
मंगळवारी (17 एप्रिल) अशी माहिती समोर आली आहे की, विराटने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सौरव गांगुलींना अनफॉलो केले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार विराट यापूर्वी गांगुलींना फॉलो करत होता, पण शनिवारच्या प्रसंगानंतर विराटने गांगुलींना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. याच पार्श्वभूमीवर विराट आणि गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
https://twitter.com/iVikramRajput/status/1647900953423802371?s=20
विराट कोहली टी-20 विश्वचषक 2021 नंतर सप्टेंबर 2021मध्ये भारताच्या टी-20 कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर विराट कोहली वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणार होता. पण बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) याला डिसेंबर 2021मध्ये नियमित टी-20 आणि वनडे कर्णधार बनवले. त्यानंतर जानेवारी 2022मध्ये विराटने स्वतः भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराटने हा निर्णय घेतला. पण या सर्व घडामोडी घडत असताना विराट आणि तेव्हा बीसीसीआय अध्यक्ष असणाऱ्या सौरव गांगुलींमधील वाद नेहमीच चर्चेत राहिला.
त्यावेळी गांगुलींना एका मुलाखतीत सांगितले होते की, “विराटकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेण्याआधी आम्ही त्याच्याशी चर्चा केली आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती त्याला केली होती.” नंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार नको असे सांगत निवडकर्त्यांनी त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद देखील काढून घेतले. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी विराटने एक ऑनलाईन पत्रकार परिषद घेत याविषयी खुलासा केला. विराटने सांगितल्याप्रमाणे, “याआधी कुठलाही चर्चा झाली नव्हती. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या एक-दीड तास आधी त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्याचे समजले.” या घटनेला आता एक वर्षापून जास्त काळ उलटून गेला आहे. मात्र, विराट आणि गांगुली यांच्यातील तनाव अजूनही तितकाच आहे, जो शनिवारी मैदानात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आला. (Virat Kohli unfollowed Sourav Ganguly on Instagram)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झुंजार खेळी करणाऱ्या सूर्याची मुंबईच्या विजयानंतर मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘वानखेडेवर आम्हाला…’
आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीविषयी धक्कादायक ब्रेकिंग! बॅटिंग कोच स्पष्टच म्हणाला…






