---Advertisement---

लाईव्ह सामन्यादरम्यान विराटची दक्षिण आफ्रिकेच्या डगआऊटमध्ये जाऊन खेळाडूंशी चर्चा, व्हिडिओ व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 12:51 PM
Virat Kohli SA
---Advertisement---

जोहान्सबर्गच्या (Johannesburg ) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी (Sa vs Ind 2nd test) सामना सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. परंतु, दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले आहे. त्याच्या ऐवजी केएल राहुलला (Kl Rahul)  संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. मैदानाबाहेर असताना देखील विराट कोहली स्वतः ला आवरू शकत नाहीये. तो अनेकदा सीमा रेषेजवळ दिसून आला. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ( ४ जानेवारी ) विराट कोहली अनेकदा कॅमेऱ्यासमोर दिसून आला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ज्यामध्ये तो दक्षिण आफ्रिका संघाच्या ताफ्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी तो दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसून येत आहे.

काही क्रिकेट चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी लिहिले आहे की, “विराट कोहलीला क्रिकेटपासून जास्त वेळ दूर ठेवता येणार नाही.”(Virat Kohli viral video)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २०२ धावा करण्यात यश आले होते. ज्यामध्ये केएल राहुलने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली होती. (Virat Kohli visits south africa camp during 2nd Test in Johanasburg)

दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव २२९ धावांवर संपुष्टात आला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून किगन पिटरसनने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली, तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ७ गडी बाद केले. तसेच दुसऱ्या डावात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ८५ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा ३५ तर अजिंक्य रहाणे ११ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.

महत्वाच्या बातम्या :

बिग बॅश लीगला कोरोनाचे ग्रहण! ग्लेन मॅक्सवेलसह १२ खेळाडू कोविड पॉसिटीव्ह

बांगलादेशचे न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजयासह मोठे विक्रम! विश्वविजेत्या ‘किवीं’ना मायभूमीत पराभवाचा धक्का

हे नक्की पाहा :

https://youtu.be/LSzFuVOwbDc

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---