क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना संघाला विजय मिळवुन देणाऱ्या खेळाडूला चाहते जरा जास्तच मान देतात. तसे ते अपेक्षितही आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या डावात फलंदाजी करत संघासाठी चांगल्या धावा करणाऱ्या खेळाडूचे कौतूक सर्वच स्तरातून होते. तसेच वनडेत धावांचा पाठलाग करतानाही चांगली फलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर कौतूकाची अशीच थाप मिळते.
या लेखात वनडेत धावांचा पाठलाग करताना भारताच्या दोन मोठ्या खेळाडूंची आकडेवारी देत आहोत. हे दोन खेळाडू यासाठी की, वनडेत सर व्हिव्हीयन रिचर्ड्सनंतर सचिन आणि त्यानंतर विराटच्या वनडेतील कामगिरीवर जगातील तमाम क्रिकेट चाहत्यांचे कायमच लक्ष राहिलेले आहे. तसेच वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन अव्वल स्थानी आजही कायम आहे तर विराटकडून हा विक्रम मोडला जाईल, अशी भविष्यवाणी क्रिकेटवर्तुळातून वर्तविली जात आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीची तुलना ओघाने येतेच. अशाच या कारकिर्दीचा हा आढावा-
कशी आहे दोघांचीही वनडे कारकिर्द-
सचिनने वनडेत ४६३ सामन्यात ४५२ डावांत फलंदाजी करताना ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. यात ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे.
दुसऱ्या बाजूला विराटने २४५ सामन्यात २३६ डावांत फलंदाजी करताना ५९.८५च्या सरासरीने ११७९२ धावा केल्या आहेत. यात ४३ शतके आणि ५७ अर्धशतकांचा समावेश आहे.
धावांचा पाठलाग करताना कोण आहे “चेस मास्टर”-
वनडेत दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मात्र विराट सचिनला बराच उजवा आहे. सचिनने धावांचा पाठलाग करताना वनडेत २४२ सामन्यात २३२ डावांत फलंदाजी करताना ४२.३३ च्या सरासरीने ८७२० धावा केल्या आहेत. यात १७ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे.
तर विराटने वनडेत धावांचा पाठलाग करताना १४१ सामन्यात १३३ डावांत फलंदाजी करताना ६८.८६ च्या सरासरीने ७०२४ धावा केल्या आहेत. यात २६ शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट सध्या धावांचा पाठलाग करताना सचिनने केलेल्या धावांच्या केवळ १६९६ धावा पाठीमागे आहे. परंतु हे करताना विराटचे सामने हे सचिनपेक्षा १००ने कमी आहेत.
धावांचा यशस्वी पाठलाग करताना केलेल्या धावा-
धावांचा यशस्वी पाठलाग करताना विराट जास्तच आक्रमक होतो. त्याने धावांचा यशस्वी पाठलाग करताना ८९ सामन्यातील ८६ डावांत विराटने ९६.२१च्या सरासरीने ५३८८ धावा केल्या आहेत. यात २२ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. ९७.७६च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला सचिनने १२७ सामन्यात १२४ डावांत फलंदाजी ५५.५४च्या सरासरीने ६०९४ धावा केल्या आहेत. यात १४ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटच्या धावा या सचिनपेक्षा केवळ ७०६ने कमी असून सरासरी मात्र १००च्या जवळ जाणारी आहे.
दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवीन कर्णधार; डूप्लेसिस ऐवजी हा खेळाडू करणार नेतृत्व
वाचा👉https://t.co/BvGtzI7Egt👈#म #मराठी #Cricket #SAvENG @QuinnyDeKock69— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
अखेर प्रतिक्षा संपली! सचिन झाला कोच
वाचा👉https://t.co/5EvkrH5ktS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वनडे संघात; धवनऐवजी टी२०साठी या खेळाडूची झाली निवड
वाचा👉https://t.co/IazJY0aMsS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020